Breaking

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

*मौजे धरणगुत्ती येथील चोरी प्रकरणी तिघां संशयिताना अटक व पोलिस कोठडी*

 

 जयसिंगपूर व धरणगुत्ती येथील तिघांना केली अटक


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : मौजे धरणगुत्ती येथील सौ. पुनम अभिजीत पवार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तिजोरीचे कुलूप तोडून ५ लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना रविवार उघडकीस आली होती. याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी संशयिताना अटक केली.

    अधिकृत सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, प्रवीण सुभाष गाडीवडर (वय वर्ष ३० रा. आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर), करण मधुकर पडियार (वय वर्ष २९ रा.माळभाग धरणगुत्ती) व सतीश संतोष नलवडे (वय वर्ष २३ रा. समडोळी मळा, शाहूनगर, जयसिंगपूर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना सोमवारी जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

   याप्रकरणी प्रसिद्ध सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा