Breaking

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

*जगात समतावादी विचारांचा प्रथम पाया व बुद्धीप्रामाण्यवादी तत्व हे जैन धर्माने जगाला दिले : प्रसिद्ध इतिहासकार मा.श्रीमंत कोकाटे यांचे प्रतिपादन*


दक्षिण भारत जैन सभेचे मुखपत्र प्रगति व जिनविजयच्या११९ व्या वर्धापन  दिनानिमित्त जाहीर व्याख्यानात मार्गदर्शन करताना प्रसिद्ध इतिहासकार श्री. श्रीमंत कोकाटे, अध्यक्षस्थानी मा. रावसाहेब पाटील ,डॉ. महावीर अक्कोळे, मा. नीलमताई माणगावे, राजेंद्र झेले, मा.पाटील व प्रा.डॉ. गोमटेश्वर पाटील


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : दक्षिण भारत जैन सभेचे मुखपत्र प्रगती व जिनविजयच्या ११९ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मा.रावसाहेब पाटील होते. प्रगती व जिनविजयचे संपादक डॉ. महावीर अक्कोळे, मा.राजेंद्र झेले व अन्य मान्यवर उपस्थित होते.

    याप्रसंगी भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, प्रख्यात इतिहासतज्ञ, शिक्षण तज्ञ व पुरात्वतज्ञ प्रा.डॉ. श्रीमंत कोकाटे मार्गदर्शन करताना म्हणाले, जगात समतावादी विचारांचा प्रथम पाया व  बुद्धीप्रामाण्यवाद हे तत्व जैन धर्माने जगाला दिले. भगवान महावीरानी जगाला सत्य, प्रेम,अहिंसा,शांती व परस्परग्रहो जीवानम तदनंतर भगवान गौतम बुद्धांनी प्रज्ञा व  करुणा ही तत्वे जगाला सांगितली. सामान्य लोकांनी या तत्वांचा स्वीकार केला. त्यामुळे वैदिक धर्मातील तत्त्वांचा त्याग करून वास्तवतेवर आधारलेला अर्थात बुद्धिप्रामान्यवर आधारित तत्त्वांचा स्वीकार करून जगात वैचारिक व परिवर्तनाची क्रांती झाली. जैन धर्माने स्त्रियांचे जीवनातील महत्त्व ओळखून त्यांना स्वातंत्र्य बहाल केले. स्त्री पुरुष समानता मानली. 

उपस्थित मोठा जनसमुदाय

      २५०० वर्षापूर्वी वृषभदेवापासून ते भगवान महावीरापर्यंत जैन धर्माचे वास्तव,मानवतावादी व जीवन उपयोगी तत्वे अंगीकारल्यामुळे मनुष्याचे जीवन सुखर झाले.डॉ. कोकाटे यांनी जैन धर्माचा संपूर्ण इतिहास संक्षिप्तपणे व अभ्यासपूर्णरित्या मांडला. वैदिक धर्मातील कर्मकांडापेक्षा जैन व बौद्ध धर्मातील तत्वे ही लोकोपयोगी होती. सम्राट चंद्रगुप्त मौर्य पासून जैन धर्माला राजाश्रय मिळाला. सद्यस्थितीत जैन धर्मातील समाज सुधारक बॅरिस्टर अण्णासाहेब लठ्ठे व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जैन धर्मातील तत्वांचा उपयोग शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी केला. 

    डॉ. कोकाटे पुढे म्हणाले, जैन धर्मामुळे मराठीला भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होत आहे. आज संपूर्ण विश्वात जागतिक अशांतता व अनैतिकतेने उच्छाद मांडला आहे. अशा परिस्थितीत भगवान महावीर अर्थात जैन तत्वज्ञान सत्य ,अहिंसा, प्रेम व शांती यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला तारणार आहे. आज प्रत्येक धर्माबरोबर जैन धर्म हा प्रत्येक मनुष्य व प्राणीमात्रेचा  विचार करणार आहे. जैन तत्वज्ञानामुळे भारतीय संस्कृतीचे उदात्तीकरण झाले आहे. तत्कालीन काळात आर्थिक व सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भगवान महावीरांचे कृतिशील तत्त्वज्ञान उपयोगी पडत होते. छ.शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी व मानवतावादी विचारांचा पाया जैन धर्मातून निर्माण झाला आहे. 

      प्रगति व जिनविजयचे संपादक डॉ. महावीर अक्कोळे यांनी कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना या विषयाच्या अनुषंगाने  प्रगति व जिनविजय या जैन धर्माच्या मुखपत्रच्या वाटचालीचा इतिहास व मुखपत्राच्या सक्षमतेसाठी कार्यरत असणाऱ्या सर्व आजी-माजी संपादकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जैन धर्माचे तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार केला. 

     उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी केला.  ज्येष्ठ साहित्यिक सौ.नीलमताई माणगावे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.सुनील चौगुले व प्रा.सौ.अंजना चौगुले-चावरे यांनी केले.

      सदर कार्यक्रमास जयसिंगपूर शहर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा