Breaking

गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

*उदगाव येथे एकाचा निर्घृण खून ; संशयित आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद*


उदगाव येथे सचिन चव्हाण याचा निर्घृण खून 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : उदगाव मध्ये एकाचा निर्गुण खून करण्यात आला आहे. जयसिंगपूर-उदगाव रोडवरील एका तरुणाचा पाठलाग करतेवेळी मृत तरुण प्रभात वेल्डिंग दुकानात घुसला त्यावेळी तरुणाचा निर्गुण खून केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, दुचाकी Java कंपनीची गाडी क्रमांक MH 10-DP-0795 गाडीवरून मृत सचिन चव्हाण जात असताना पाठलाग करून दोन  संशयितानी धारदार शस्त्रानी उदगाव मधील प्रभात वेल्डिंग वर्क्स या दुकानात घुसून निर्गुण खून केला आहे. 

     माहिती मिळताच घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस दाखल होऊन दोन संशयित आरोपींना निर्भया पथकातील पी.एस पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमित भोरे, विक्रम मोरे व शैलेश पाटील यांनी पाठलाग करून ताब्यात घेतल्याची माहिती घटनास्थळावरून समजते.

     घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा