![]() |
अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक व व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या चेअरमन पदी निवड प्राचार्य डॉ. शिवाजी एम भोसले |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या चेअरमन पदी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडीचे प्राचार्य डॉ. शिवाजी भोसले यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रातील अर्थशास्त्र परिवारात एक आनंददायी व समाधानकारक वातावरण पसरले आहे.
आदरणीय प्राचार्य.डॉ. शिवाजीराव भोसले यांची शिवाजी विद्यापीठाच्या व्यावसायिक अर्थशास्त्रच्या अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन म्हणून त्यांनी हाती धुरा स्वीकारल्यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्र विषयाला आपल्या धोरणात्मक,बौद्धिक व संघर्षमय चर्चेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम त्यांनी केले. यापुढेही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र विषयाला वाणिज्य व व्यवस्थापन शाखेत त्याचा पूर्वीचा दर्जा अबाधित ठेवण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
विद्यमान परिस्थितीत श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडीचे प्रा.डॉ. शिवाजी भोसले हे आपल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नावाप्रमाणे सर्व घटकांशी विचारांशी कृतीरुपी नाळ बांधून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व विविध क्षेत्रात आपली दैदिप्यमान कामगिरी करीत आहेत.मुळात आमचे गुरुबंधू व मार्गदर्शक प्राचार्य व कर्मवीर भाऊराव पाटील या शैक्षणिक परिवारातील एक सच्चे रयत सेवक म्हणून त्यांनी अविस्मरणीय कामगिरी केली आहे.
प्राचार्य डॉ.शिवाजी भोसले हे नाव शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात परिचयाचे,अर्थशास्त्र विषयाला बळ व न्याय देण्याचे काम करीत आहे. अत्यंत शांत,संयमी व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांना अर्थशास्त्राच्या विविध पदे प्राप्त झाल्याने त्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. मुळात अर्थशास्त्र विषयाची गुणवत्ता अबाधित ठेवणे, विषय विद्यार्थीप्रिय व विद्यार्थी केंद्रित असावा यासाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे. अर्थशास्त्र विषयासाठी त्यांनी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून रयत परिवारात आपली स्वतःची एक विद्यार्थी केंद्रित व विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ओळख निर्माण केली आहे. कर्मवीर अण्णांच्या विचारांशी नाळ जोडून त्यांनी त्यांच्या तत्त्वाचे तंतोतंत पालन करीत आपला शैक्षणिक प्रवास चालू ठेवला आहे.
डॉ.भोसले यांना ३६ वर्षे अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी ३६ वर्षाच्या शैक्षणिक प्रवासात अर्थशास्त्र विषयासाठी विविध पदावरती कार्यशील पणे काम केले आहे. मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या माध्यमातून राज्यपातळीवरती अर्थशास्त्र विषयाच्या गुणवत्ता वृद्धिगत व्हावी. तसेच शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्राप्त परिस्थिती व बदलते आर्थिक आयाम याचा सारासार विचार करून संशोधनात्मक कार्याला कसे उच्च स्थान देता येईल. संशोधनात्मक कार्य सुकर व गुणवत्तापूर्ण कसे होईल. तसेच अर्थशास्त्र परिवाराला या संघटनेच्या माध्यमातून उत्तमरीत्या कसे बांधता येईल व विषयाचं स्थान उच्च कोटीचे अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी कालवश ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ. जे.एफ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम काम केले. प्राचार्य डॉ.भोसले यांनी लेखक म्हणून पाठ्यपुस्तके व संदर्भ ग्रंथाची निर्मिती केली. जवळपास ६० पेक्षा अधिक गुणवत्ता व अभ्यासपूर्ण पुस्तके लिहून अर्थशास्त्र विषयाचे महत्व वृद्धिगत करून अर्थशास्त्राच्या प्राध्यापक, विद्यार्थी व स्पर्धा परीक्षक विद्यार्थ्याला अद्यावत माहिती व ज्ञानाची शिदोरी उत्तम ग्रंथाच्या माध्यमातून बहाल केली.
शिवाजी विद्यापीठाचे अधिकृत एम.फिल. व पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली ८ विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. त्यांचा अभ्यास पूर्ण संशोधनात्मक कार्य राष्ट्र व समाजभिमुख असून ४० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय व राज्य पातळीवर संशोधनात्मक पेपर प्रकाशित व सादर केले आहेत. त्यांच्या गुणवत्ता पूर्ण संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांच्या एका संशोधन पेपरला धनंजय गाडगीळ बेस्ट रिसर्च पेपर पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्राचार्य डॉ. भोसले यांचं संशोधनात्मक कार्य एक मैलाचा दगड ठरु पाहत आहे.
प्राचार्य डॉ.भोसले यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून ही काम पाहिले आहे. तसेच सिनेट सदस्य म्हणून त्याकाळी केलेलं कार्य वाखण्याजोगे आहे. शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभागाने सोपवलेली प्रत्येक कामगिरी अत्यंत चोखपणे पार पाडली आहे.
रयत परिवारातील एक हक्काचा व कार्यशील प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी रयत परिवारातील प्रत्येक घटकासाठी ते कार्यरत राहिले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून रचनात्मक नवनिर्मिती करणे ही त्यांची एक विशिष्ट खासियत आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या या प्रवासात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय व रचनात्मक कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत. शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिक्षक पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार मा.कुलगुरू डॉ. डी टी शिर्के यांच्या हस्ते स्वीकारून ते सन्मानित झाले आहेत. रयत परिवारातील रयत शिक्षण संस्थेचा बॅरिस्टर पी.जी.पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी बरोबर सामाजिक क्षेत्रात आपल्या रचनात्मक कार्याच्या माध्यमातून विद्यार्थी व जनमानसावर ठसा उमटविला आहे. आयुष्यभर सर्वसामान्यांचे प्रश्न चळवळीच्या माध्यमातून राबवण्याचे काम त्यांनी केले. जवळपास २४ वर्षे एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी म्हणून विद्यार्थी घडवण्याचे व सामाजिक चळवळीला राष्ट्रीय चळवळ बनवण्यामध्ये ते अग्रेसर होते. डॉ. भोसले हे वक्तशीर,अत्यंत संवेदनशील, ज्येष्ठ विचारवंत, शोधक वृत्ती असणारे संशोधक, अभ्यासू व्यक्तिमत्व, सामाजिक भान जपणारा, प्रशासकीय अनुभव असणारे, सर्व घटकांची नाळ जोडणारे एक प्रतिभावंत प्राध्यापक सद्यस्थितीत प्राचार्य म्हणून अत्यंत कुशल पद्धतीने महाविद्यालयाचा कारभार चालवत आहेत. त्यांच्या या निवडीने समस्त अर्थशास्त्र परिवारात आनंदमय जल्लोष निर्माण झाला आहे.
प्राचार्य डॉ. शिवाजी एम.भोसले यांच्या अभूतपूर्व कार्याला सलाम! भावी आयुष्यासाठी जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्यावतीने खूप खूप शुभेच्छा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा