Breaking

गुरुवार, २३ मे, २०२४

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व कोल्हापूर जिल्ह्याचे नेते पी.एन. पाटील यांची प्राणज्योत मालवली*


 काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार कालवश पी.एन.पाटील 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील आज पहाटे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.

      काही दिवसांपूर्वी बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

     या प्रसंगी कोल्हापूर काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी फेबुकवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो.”

     कालवश पी.एन.पाटील यांच्या दुर्दैव मृत्यूने कोल्हापूर शहर व जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा