Breaking

गुरुवार, २३ मे, २०२४

*आय.आर.पाटील व अजित पाटील यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम भावनापूर्ण वातावरणात संपन्न*


सेवानिवृत्त प्रशासकीय कर्मचारी आय आर पाटील व अजित पाटील यांचा सत्कार करताना डॉ. सुभाष अडदंडे व डॉ.महावीर अक्कोळे, सोबत प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व अन्य मान्यवर 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामती संचलित जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर चे प्रशासकीय कर्मचारी आय.आर.पाटील व  प्रयोगशाळा सहाय्यक अजित पाटील यांची सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम जयसिंगपूर कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे व संस्था सदस्य बाळासाहेब इंगळे व प्राचार्य डॉ.एस.ए. मांजरे उपस्थित होते.

      प्रारंभी प्राचार्य डॉ.एस.ए. मांजरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांविषयी भावनापूर्ण मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले, अजित पाटील हे शांत,संयमी व कार्यमग्न असणारे कर्मचारी आहेत.तर आय.आर.पाटील हे सर्वश्रुत व्यक्तिमत्व आहे. या दोघांनी आपलं कर्तव्य व जबाबदारीचे योग्यपणे पालन केले आहे.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. सुभाष अडदंडे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे

      अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. सुभाष अडदंडे म्हणाले, या दोघांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून इतर घटकांना त्यांचे कार्य प्रेरणा देणारे व आदर्शवत आहे. याही पुढे या दोघांची गरज असून ते विद्यार्थी व महाविद्यालयीन विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत.

     याप्रसंगी आय.आर.पाटील  सत्काराला उत्तर देताना म्हणाले, कॉलेजने माझे आयुष्य घडवले. मला वैयक्तिक सहकार्य करून आर्थिक उन्नती घडवली. यामध्ये विशेष करून माजी प्राचार्य.डॉ.डी.डी. मगदूम यांनी केलेल्या सहकार्यासाठी विशेष आभार मानले.

      अजित पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले, सुरुवातीपासून रसायनशास्त्र विभागात केलेलं काम व सहकाऱ्यांनी दिलेली साथ यामुळे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम व्यवस्थित रित्या करता आले. मी महाविद्यालय व रसायनिक शास्त्र विभागातील सर्व घटकांचा ऋणी आहे. या महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्तम सहकार्य केल्याने हे माझे सेवानिवृत्ती पर्यंत चे करिअर व्यवस्थित रित्या पूर्ण करता आले.

       यावेळी प्रा.डॉ.बी.एम. सरगर, प्रा.डॉ. टी.जी.घाटगे, प्र.कार्यालयीन अधीक्षक ए.बी. कांबळे व आय आर पाटील यांची कन्या सौ. निवेदिता पाटील यांनी गतकाळाच्या आनंदमय भावनेला उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.

    अजित पाटील व आय. आर.पाटील यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य डॉ.एन.पी.सावंत यांनी मानले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ.सौ. सुनंदा शेळके यांनी केले.

     या कार्यक्रमास सर्व शाखेचे उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी व सेवक, सेवानिवृत्ती सत्कारमूर्तींचे मित्रमंडळी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा