Breaking

बुधवार, २२ मे, २०२४

जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरचा १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल ९१ टक्के*

 

बारावी बोर्ड परीक्षेत जयसिंगपूर कॉलेजचे घवघवीत सुयश


*प्रा. सुनिल चौगुले : विशेष प्रतिनिधी*


  जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

      कॉलेजच्या विज्ञान विभागात प्रथम क्रमांक कु.समीक्षा जितेंद्र कुकडे (८५.६७%), द्वितीय क्रमांक, कु. निशांत नागनाथ सोनकांबळे (८२.००%) तृतीय क्रमांक, कु. प्राची प्रशांत पाटील (८०.३३%) यांनी पटकाविला. विज्ञान विभागाचा एकूण निकाल ९७.५६% इतका आहे.    

        वाणिज्य विभागात गुणानुक्रमे  कु. साक्षी बाळासो चौगुले (८६.१७%), कु. पूजा सदाशिव हडपद (८२.००%), कु. अफसर मुसा नंदगावे (८०.८३%) असून वाणिज्य विभागाचा एकूण निकाल ९३.६३ % असा आहे

      कला विभागातील प्रथम क्रमांक कु. खुशबू इसाक बागसार (७१.८३%), द्वितीय कु. अस्मित उदय खांडेकर (६९.६७%), तृतीय कु. आरिफ लाडलेसाब नदाफ (६८.००%) संपादन केला आहे.  कला विभागाचा एकूण निकाल ६१.११% इतका आहे. 

   या तीनही विभागाचा मिळून कॉलेजचा एकूण निकाल ९१.०३ % लागला आहे. 

       सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार मा. पद्माकर पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, पप्राचार्य प्रा. भारत आलदर, सुपरवायझर डॉ. महावीर बुरसे, सर्व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी यांचेकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदनीय कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा