Breaking

मंगळवार, ७ मे, २०२४

कोदे खुर्द - मानवी वस्ती शेजारी आढळला अजगर, कोल्हापूर रेस्कू टीमने केला रेस्कू.

 

गगनबावडा रेस्कू टीम



मालोजीराव माने, कार्यकारी संपादक 

गगनबावडा - येथील कोदे खुर्द मध्ये ७.५ फुटाचा अजगर हा बिनविषारी साप आढळला. संभाव्य धोके टाळण्यासाठी वनक्षेत्रपाल प्रियांका भवर यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा रेस्कू टीमचे रेस्क्युअर समाधान व्होवळे, सचिन सुतार, अजित जाधव आणि अजित पाटील यांनी  या सापाला रेस्कू करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

इंडियन रॉक पायथन म्हणून ओळखला जाणारा हा साप बिनविषारी असून जवळपास 18 फुटांपर्यंत वाढतो. कोंबड्या, लहान कुत्रे, शेळ्यांची पिल्ले यांना आपले भक्ष्य बनवतो. मानवास याचा कोणताही धोका नाही. घोणस समजुन लोक याला मारतात म्हणून या सापाला मानवी वस्तीपासून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. - समाधान व्होवळे, रेस्कुअर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा