Breaking

शुक्रवार, ३१ मे, २०२४

*शिरोळच्या प्रा.अंजना संजय चावरे-चौगुले या राज्यस्तरीय नारीशक्ती अवॉर्ड २०२४ या पुरस्काराने सन्मानित*


प्रा.सौ. अंजना संजय चावरे-चौगुले या नारीशक्ती अवॉर्ड २०२४ ने सन्मानित ; हा पुरस्कार प्रदान करताना साधना पाटील  


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध आनंदगंगा फौंडेशन (मिणचे),कोल्हापूरच्या वतीने प्रा. अंजना संजय चावरे-चौगुले (सहा. शिक्षिका) जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांना राज्यस्तरीय नारीशक्ती अवॉर्ड २०२४ या पुरस्काराने गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार शिराळास्थित यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा साधना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


      मुळात प्रा. अंजना संजय चावरे- चौगुले यांचे विशेष सन्मान होणे हे प्रत्येक घटकाला व महिलांना अपेक्षित आहे. कारण प्रा.अंजना चौगुले यांचे शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक, कला व  सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. एक प्रामाणिक,अभ्यासू, संशोधकीय, विद्यार्थी प्रिय शिक्षका म्हणून त्यांचा सर्वत्र बोलबाला आहे. नियोजनबद्ध वर्तन, उत्तम वक्त्या, अनमोल वाणी, उत्तम साहित्यिका, लेखिका, कवयित्री, निवेदिका, समाजशील व संवेदनशील अशा अनेक व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलूंनी त्या परिपूर्ण आहेत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हिंदी विषयातून एम.फील. पदवी संपादन केली. कला व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धार्मिक क्षेत्रात अर्थात जैन तत्त्वज्ञान पूर्णपणे अंगीकारून सत्य,प्रेम व अहिंसा या जैन तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब करून उत्तम धर्मपालनासाठी त्या सदैव कटीबद्ध आहेत. विविध ठिकाणी अभ्यासू व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी घटकांच्या विकासासाठी त्या सदैव तत्पर असून शैक्षणिक नवोपक्रम राबवणे हे त्याची खासियत आहे.

 अशा या परिपूर्ण, कार्यशील, कर्तव्यशील व बहुआयामी शिक्षिकेचा सन्मान होणे हे प्रत्येक व्यक्तीसाठी समाधानकारक व प्रेरणादायी आहे.

       त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. सदर सन्मानपत्रात

    ।। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ।। या उक्ती प्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात अप्रतिम अशी कामगिरी केली आहे. अशा गुणवान कीर्तीवान महिलांचा सन्मान करण्यात आला.आपण केलेल्या कार्यामुळे आपला तसेच आपल्या कुटुंबाचा उद्धार झाला आहे. आपण अनेक संकटांचा सामना करत प्रसंगी वेगळे व धाडसी निर्णय घेवून आपले निर्णय सिद्ध करून दाखवले आहेत. यश काय असतं व ते कस मिळवायचं असतं हे आपणाकडे पाहून कळतं. आणि यश मिळवण्या बरोबरच ते टिकवणं हे ही महत्वाच असतं. दुर्गेच्या नऊ रूपाला साजेसं अस आपल यश आहे. आपल हे कार्य संपूर्ण नारी जातीस प्रेरणादायी आहे.

    आपण केलेल्या कार्याला सलाम म्हणूनच आनंदगंगा फौंडेशन आपणास "राज्यस्तरीय नारीशक्ती अवॉर्ड २०२४" हा पुरस्कार प्रदान करत आहे. हा सन्मान करताना आम्हास अत्यानंद होत आहे. या पुरस्कारामुळे आपणास कार्य करण्यास आणखी बळ मिळो. आपले कार्य उत्तरोत्तर असेच बहरत जावो.आपणास या पुरस्कारातून प्रेरणा मिळो तसेच आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा! 

     या अगोदरही प्रा. अंजना चौगुले या अनेक पुरस्काराने सन्मानित झाल्या आहेत. सदर कामी त्यांचे पती संजय चावरे यांचे मोलाचे प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.प्रा. अंजना चौगुले या पुरस्काराने सन्मानित झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा