![]() |
कु.यश मयुरी सुनील चौगुले, जयसिंगपूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : एस.एस.सी अर्थात दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये जनतारा हायस्कूल, जयसिंगपूरचा विद्यार्थी कु.यश सुनिल चौगुले याने ९५.८० % गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुळात यश चौगुले हा विद्यार्थी अत्यंत शांत,संयमी, प्रामाणिक व अभ्यासू विद्यार्थी म्हणून परिचयाचा आहे. त्याच्या या यशाबद्दल जय हिंद न्यूज नेटवर्शी बोलताना तो म्हणाला, नववी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच दहावी बोर्ड परीक्षेचे अभ्यासाचे उत्तम व काटेकोर नियोजन केलं होते. दररोज सहा तास अभ्यास, आई-वडिलांनी घेतलेली घरची शिकवणी, शाळेतील शिक्षकांनी केलेलं उत्तम मार्गदर्शन, अभ्यासातील सातत्य, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा उत्तम सराव तसेच उत्तम नियोजनाच्या आधारावर इतके गुण प्राप्त करता आले.
तसेच यश चौगुले ची दुसरी बाजू म्हणजे यशला मुळातच चित्रकलेची विशेष आवड आहे. त्यामुळे तो नेहमी कोणतेतरी व्यक्तिचित्र रेखाटत असतो आणि फेसबुकच्या माध्यमातून त्याची कला सर्व घटकांना पहायला मिळते. एवढी मोठी कला जोपासत त्याने १० वी बोर्ड परीक्षेतही स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली हे कौतुकास्पद आहे. खासदार राजू शेट्टी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व अनेक मान्यवर व्यक्तींचे व्यक्ती चित्र रेखाटले आहे.
त्याने मिळविलेल्या या गुणवत्तेमध्ये त्याचे आई-वडील प्रा. सुनील धनपाल चौगुले व मयुरी सुनील चौगुले, समस्त शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्या निमित्ताने यशचे सर्कल ग्रुपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्कल ग्रुपचे प्रा. डॉ. महावीर बुरसे,प्रा. डॉ. प्रभाकर माने, प्रा. बाळगोंडा पाटील, प्रा. सुशांत पाटील, प्रा. शितल पाटील उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा