![]() |
मार्गदर्शन करताना डॉ. प्रभाकर माने, नूतन प्राचार्य डॉ. विकास मिणचेकर, माजी प्राचार्य डॉ. धनंजय कर्णिक व सन्माननीय प्राध्यापक वृंद |
*प्रा. डॉ.महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे जी.के.जी घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर येथे श्रीमंत छ.शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त विशेष व्याख्यान बुधवार दिनांक २६ जून, २०२४ रोजी संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जयसिंगपूर कॉलेज अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षांस्थानी नूतन प्र-प्राचार्य डॉ. विकास मिणचेकर उपस्थित होते.
डॉ. प्रभाकर माने मार्गदर्शन करताना म्हणाले,शेती व शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा लोकराजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होय. छ.शाहू राजेंनी करवीर संस्थानाच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शाहू राजांनी उचललेली पावले व धोरण हे कृषी क्रांति व शेती विषयक विकास घडवून आणणारी होती. त्यामधील शेतीसाठीचे चहा व कॉफीचे नव- नवीन प्रयोग, कृषी प्रदर्शन, शेतीची आधुनिक पद्धती, राधानगरी धरणाची निर्मिती, मधुमक्खी पालन, जनावरांची पैदास, कृषी महाविद्यालय व कृषी शिक्षणाच्या माध्यमातून चौफेर केलेली प्रगती ही क्रांतिकारक आहेत. तसेच व्यापार, सहकार, राजस्व, उद्योग क्षेत्र, मूलभूत क्षेत्र, सेवाक्षेत्र, जाती व्यवस्था निर्मूलन व आरक्षण यामध्ये केलेली प्रगती उल्लेखनीय असल्याबाबतचे मत व्यक्त केले.डॉ.माने पुढे म्हणाले,शाहू राजांनी आपल्या तह हयातीत कोल्हापूर संस्थानातील शेती व शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याच्या पाण्याची व्यवस्था करून त्यांच्यासाठी सातत्याने झटणारा व जाणता राजा असल्याबाबतचे मत प्रतिपादित केले.
अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना नूतन प्र-प्राचार्य डॉ. विकास मिणचेकर म्हणाले, छ.शाहू महाराजांनी महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानून संस्थानाच्या विकासाचा विशाल दृष्टिकोन, शेती व शेतकरी विकासाचा ध्यास अंगी बाळगला. माझं जीवन कार्य म्हणजेच राधानगरी धरण असे मानणारा राजा , सहकारी क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी करून उद्योग- व्यापार क्षेत्रात उंच भरारी घेतली. लोककल्याणकारी दृष्टी, असंख्य चळवळीचे जनक, शिक्षण तज्ञांचा मेंदू ब्राह्मणेतर चळवळीचा पाठीराखा, कलावंतांचा आश्रयदाता, मानवतावादी दृष्टिकोन जपणारा व सत्यशोधकी पद्धतीने कार्य करणारा राजा माणूस म्हणजे छत्रपती शाहू महाराज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक डॉ. वाघमारे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. संदीप रावळ यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. मिणचेकर याचे उत्तम मार्गदर्शन व सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. पंडित वाघमारे व डॉ. संदीप रावळ यांनी केले.
या कार्यक्रमास माजी प्र-प्राचार्य डॉ.धनंजय कर्णिक, डॉ.पी. डी.चंदनशिवे, प्रा. आर.एस.पाटील, डॉ.उमाजी पाटील, डॉ.गौतम ढाले, डॉ. गजानन चव्हाण, डॉ.पाटील, अन्य प्राध्यापक वृंद व कार्यालयीन अधीक्षक मा. मोटे, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा