![]() |
छ.शाहू जयंतीनिमित्त शोभायात्रा संपन्न : माझी वसुंधरा अभियानांतर्गत ५.० वृक्षारोपण करताना मुख्याधिकारी मा. टीना गवळी व स्वच्छता अधिकारी संदीप कांबळे व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूरच्या वतीने आज २६ जून,२०२४ रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून शोभा यात्रेचे आयोजन व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत भारतीय प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
शिरोळ विधानसभेचे आमदार मा.राजेंद्र पाटील-यड्रावकर व जयसिंगपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. टीना गवळी यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज व जयसिंगराव महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शोभा यात्रेची वैशिष्ट्ये : १)जयसिंगपूर शहरातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. २) जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रे मध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये एका स्वयंसेवक विद्यार्थ्यांने शाहू महाराज यांचा पेहराव करून सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला. ३) शहरातील नागरिक व शालेय विद्यार्थी पारंपारिक वेशभूषासह व ढोल ताशांच्या गजरामध्ये या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते. पर्यावरण संवर्धन व जनजागृतीचा संदेश या प्रभात फेरीमार्फत देण्यात आला.४) शाळेतील विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यासाठी हातामध्ये फलक घेतला होता. ५) शोभा यात्रेच्या दर्शनी जयसिंगपूर नगर परिषदेचा सुंदर पद्धतीने सजवलेला शोभारथ व त्यामध्ये शाहू महाराजांचा वेशभूषा परिधान केलेला विद्यार्थी होता.६) शोभा यात्रेत सहभागी असणाऱ्या सर्व घटकांच्या मध्ये जयंती साजरी करताना प्रचंड उत्साह होता.७) शोभा यात्रेची सुरुवात क्रांती चौकातून व शोभा यात्रेचा समारोप सिद्धेश्वर मंदिराजवळ नगरपालिका कार्यालया समोर झाला.
या शोभा यात्रेत मुख्याधिकारी मा.टीना गवळी,उपमुख्याधिकारी सौ. माने मॅडम,जयसिंगपूर नगर परिषदेचे शिक्षण अधिकारी मा. मेघन देसाई, जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, शाळेचे शिक्षक, कॉलेजचे प्राध्यापक, एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर,डॉ. प्रभाकर माने, उपप्राचार्य प्रा.भारत आलदर, डॉ. महावीर बुरसे,प्रा.सुरज चौगुले,जयसिंगपूर नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी, माजी नगरसेवक, कर्मचारी, एनएसएसचे विद्यार्थी व शाहू प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा