Breaking

सोमवार, ८ जुलै, २०२४

*पुणे स्थित INLESYS संस्थेकडून आयोजित INIQ-TEST परीक्षेत अनेकांत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

 

डॉ.ए.आर.मांडवे (Director of INLESYS) यांचेकडून विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करताना याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी प्रा.आप्पासाहेब भगाटे,
महावीर पाटील, बिपिन खाडे, सी.ई.ओ प्रा. अभिजीत अडदंडे,मुख्याध्यापक सौ.प्रिया गारोळे ,व अन्य मान्यवर

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  पुणे स्थित INLESYS संस्थेकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या ऑनलाईन INIQ-TEST परीक्षेत अर्थात बौद्धिक गुणांक परीक्षेत अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. सदरची परीक्षा १९ मार्च,२०२४ रोजी एकाच वेळी संपूर्ण जगात ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली होती. शिरोळ तालुक्यातील या परीक्षेचे केंद्र अनेकांत स्कूल येथे होते. जगभरातील विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याच्या मूलभूत गोष्टींसह विद्यार्थ्यांचे करिअर करण्यासाठी वचनबद्ध असणारी संस्था आहे.

      अनुराग पाटील व साहिलकुमार भोगुलकर या अनेकांत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल स्तरावर 9 वा क्रमांक पटकाविला.  प्रयागराज कांबळे व सौरीश पवार यांनी महाराष्ट्र राज्यात अनुक्रमे 2 रा व 3 रा क्रमांक पटकाविला. अबुझार मुजावर, स्वानंदी बागल यांनी कोल्हापूर जिल्हास्तरावर अनुक्रमे 2 रा व 3 रा क्रमांक मिळविला.

      तसेच अनुज पाटील, अश्विका गळतगे, अद्विका मगदूम, अमोघ गारोळे, श्रीशा शेलार, आयुष पाटील यांनी जयसिंगपूर-शिरोळ विभागात यश संपादन केले.शाळेतील एकूण 45 गोल्ड मेडल, 51 सिल्वर मेडल, 28 ब्राँझ मेडल असे एकूण 124 मेडल मिळवून INIQ-Test मध्ये बाजी मारली. सदरची परीक्षा ऑनलाईन स्वरूपात पार पडली. 

     INLESYS ही संस्था विद्यार्थ्यांचे योग्य करिअर पर्याय निवडण्यासाठी मनोवैज्ञानिक IQ  पैलूंच्या मदतीने त्यांना यशस्वी करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन करते. 

   यासाठी डॉ.ए.आर.मांडवे (Director of INLESYS), सागर माळी (Chief Executive Officer, INLESYS), अनिरूध्द माने (Chief Administrative Officer, INLESYS) यांचे सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे पदाधिकारी मा.प्रा.अप्पासाहेब भगाटे, मा. महावीर पाटील, मा. विपीन खाडे, सी.ए.मा.कोरूचे, स्कूलचे सी.ई.ओ प्रा.अभिजीत अडदंडे , मुख्याध्यापिका सौ. प्रिया गारोळे आणि समन्वयक कल्याणी अक्कोळे मॅडम या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.सदर विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा