Breaking

शनिवार, ६ जुलै, २०२४

*जयसिंगपूरच्या श्रीमती गंगाबाई घोडावत कन्या महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी प्रा.डॉ. विकास मिणचेकर यांची निवड*


नूतन प्र.प्राचार्य डॉ. विकास मिणचेकर, 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : सांगलीच्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयाच्या नूतन प्र.प्राचार्य पदी मानसशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक डॉ. विकास मिणचेकर यांची निवड झाली आहे.

      प्र. प्राचार्य डॉ. धनंजय कर्णिक यांची नुकतीच सेवानिवृत्ती झाल्याने रिक्त असलेल्या प्राचार्य पदासाठी डॉ. विकास मिणचेकर यांच्या नावाची चर्चा झाली. संस्थेच्या वतीने नूतन प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांची नेमणूक केली आहे. 

     प्रा.डॉ. विकास मिणचेकर हे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अव्वल असून प्रशासकीय पदाचा अनुभव आहे.डॉ. मिणचेकर यांची शैक्षणिक विकासात्मक प्रगती पाहता ते सध्या मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असून त्यांनी आपल्या विषयाचा अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून अत्यंत सक्षम, ज्ञानवादी, उपयोजित व विद्यार्थी केंद्रित केला आहे. 

     शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र शाखेचे ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच शिवाजी विद्यापीठ मानसशास्त्र कॉन्फरन्सचे विद्यमान अध्यक्षपदी नियुक्त आहेत. एम.पी.एस.सीच्या पेपर सेटर पॅनलवर आपली सेवा बजावीत आहेत. 

    डॉ. मिणचेकर यांचा संशोधनात्मक कार्याचा आवाका राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उच्च कोटीचा राहिला आहे. त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून  आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जवळपास १७ देशांना भेटी दिल्या आहेत. मानसशास्त्र या विषयातील जवळपास ७० संशोधन पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित केले आहेत. तसेच त्यांनी दोन मोठे संशोधनात्मक प्रकल्प (Research Project) पूर्ण केले आहेत.त्यांनी मानसशास्त्रीय संशोधना बरोबर एक  मानसशास्त्र विषयाचा लेखक म्हणून सहा पुस्तके प्रकाशित केले आहेत. तसेच विविध जर्नलच्या संपादकीय काम त्यांनी उत्तम पद्धतीने पार पाडले आहे.

       डॉ. मिणचेकर यांच्या आंतरराष्ट्रीय संशोधनात्मक कामातील गुणवत्ता व विश्वासहर्ताचे विचार करून  जपानच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये २ वेळेस त्यांना बीजभाषकाचा मान दिला आहे. तसेच फिलिपाईन्स आणि जर्मनी या दोन देशातील आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये चार वेळेस चेअर सेशन म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय संशोधनात्मक कामाचा व्याप वाढत असून त्यांना विविध आंतरराष्ट्रीय असोसिएशनचे सदस्यत्व बहाल केले आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अनेक समित्यावर काम पाहिले आहे. अत्यंत तरुणपणी संशोधनात्मक कामाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर एक संशोधनात्मक दबदबा निर्माण केला आहे.

       डॉ. मिणचेकर हे फक्त शैक्षणिक व संशोधनात्मक कामाबरोबर संघटनात्मक पातळीवर प्राध्यापकांच्या न्याय व हक्कासाठी FASTA नावाच्या लढाऊ संघटनेच्या माध्यमातून ते एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते अभ्यासू व लढाऊ उपाध्यक्ष या पदापर्यंत स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर पोहोचलेले आहेत. विविध सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समाजभान जपणारा प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे.

       डॉ. मिणचेकर सामाजिक कार्याच्या माध्यमातून ते सामान्य लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. त्यांनी विविध एनजीओंना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांनाआर्थिक स्वरूपात  देणगी व मदत देऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेला आहे. पर्यावरणवादी असल्याने पर्यावरणाबाबत ते सजग असतात. डॉ.मिणचेकर यांची शैक्षणिक व सामाजिक सेवेचे कार्य अखंड व निरंतर असून त्यांच्या कार्याची दखल घेत आमदार डॉ.सुजित मिणचेकर फाउंडेशनच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

        जयसिंगपूरच्या श्रीमती गंगाबाई घोडावत कन्या महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी प्रा.डॉ. विकास मिणचेकर यांची निवड झाल्याने विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी या घटकांनी त्यांना शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला आहे.

      डॉ.विकास मिणचेकर यांची प्र.प्राचार्य पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा