![]() |
डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे विविध कंपन्यात निवड |
*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीरिंगच्या ९८ विद्यार्थ्यांची सायबर सक्सेस पुणे, पल्ले टेक्नॉलॉजीज बंगलोर, किरण अकादमी पुणे व क्यू स्पाइडर्स कनेक्ट अशा विविध सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी.पी. माळगे यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजीनियरिंग विभागाचे ४९ विद्यार्थी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे ३५ विद्यार्थी, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंगचे ०४ विद्यार्थी व एम.सी.ए. विभागाच्या १० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम, व्हॉइस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्राचार्य डॉ. गोपाल मुलगुंड यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. नोकरीसाठी विद्यार्थ्यांची निवड केलेल्या कंपन्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाऊड कॉम्प्युटिंग, वेब जन टेक्नॉलॉजी यामध्ये नामांकित आहेत.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, प्रत्येक विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर प्राध्यापक, विभाग प्रमुख व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा