Breaking

गुरुवार, १८ जुलै, २०२४

*आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन आघाडीच्या बांधणीतून सक्षम लढा उभारणीचा निर्णय*

 

पुणे येथे शेतकरी चळवळीतील विविध शेतकरी संघटनाच्या 
              ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


पुणे : राज्यातील शेती, शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या  न्याय व हक्कासाठी, विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तसेच आगामी  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर सर्व संघटना व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सक्षम लढा उभारण्याचा निर्णय राज्यातील शेतकरी चळवळीच्या मुख्य प्रवाहातील शेतकरी संघटनाच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक पुणे येथील नवीन शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली.

    यावेळी परिवर्तन आघाडीच्यावतीने बेरोजगारी, वाढत्या शेतकरी आत्महत्या , सातत्याने पडत चाललेले शेतमालाचे दर , कर्जाच्या बोजाखाली दबलेला शेतकरी , केंद्र सरकारचे चुकीचे आयात व निर्यात धोरण, दिवाळ खोरीच्या उंबरठ्यावर असलेली राज्याची आर्थिक स्थिती , राज्यातील सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक , व आरोग्य विषयक क्षेत्रामध्ये काम करणा-या सामाजिक संघटना यांना सोबत घेऊन आघाडी लढा उभारून परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय देण्याचा निर्णय झाला. 

     आघाडीच्यावतीने राज्यातील विविध संघटना व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन २८८ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० जुलै,२०२४ रोजी छ. संभाजीनगर येथे जागावाटप व पुढील धोरणाबाबत बैठक होणार आहे. या बैठकीस मा. आमदार वामनराव चटप, मा.खासदार राजू शेट्टी, मा.आमदार शंकर आण्णा धोंडगे , अनिल घनव , ललित बहाळ , डॉ.महावीर अक्कोळे , योगेश पांडे यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा