![]() |
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दुसरा दक्षिण द्वार सोहळा संपन्न |
*प्रा.चिदानंद अळोळी : उपसंपादक*
श्री क्षेत्र नृसिंहवाडी : येथे पावसाचा जोर वाढललेने कृष्णा व पंचगंगा नदीची पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होत आहे.श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात आज शनिवार दि.20/07/24 रोजी दुपारी 1.30 वाजता चालू सालातील दुसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.गेली तीन-चार दिवस पावसाचा जोर जास्त झालेने व धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे.
याच आठवड्यात मंगळवार दि 16/07/24 रोजी पहाटे 4.15 वाजता पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झालेला होता. त्यानंतर लगेच सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा सुद्धा संपन्न झाला होता.त्यानंतर आज दुपारी 1.30 वा दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.
संपूर्ण महाराष्ट्रासह ,कर्नाटक , आंध्रप्रदेश व गोवा या राज्यातील लाखो दत्तभक्त हे प्रत्येक वर्षी नृसिंहवाडीत दर्शनासाठी येत असतात . त्याचप्रमाणे या दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान करण्याचा लाभ भाविक घेत असतात .त्यातच आज शनिवार दुपारची वेळ असलेने भाविकांची स्नानासाठी खूपच गर्दी होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा