![]() |
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, मा. सागर कांबळे मार्गदर्शन करताना सोबत आयोजक मा. विनायक कुलकर्णी, उप प्राचार्य.प्रा.डॉ.सौ. विजय माला चौगुले व डॉ. खंडेराव खळदकर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था, मिरज व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचे संयुक्त विद्यमाने 'स्वच्छ महाराष्ट्र मिशन (नागरी २.०) अंतर्गत स्वच्छता मित्रांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा' आज दिनांक १९ जुलै, २०२४ रोजी संपन्न झाली.
सदर कार्यशाळेत यशदा संस्थेचे मास्टर ट्रेनर मा. सागर कांबळे यांनी स्वच्छता मित्रांसाठी उत्तम पद्धतीचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामध्ये कचऱ्याचे विलगीकरण, घरोघरी घनकचरा संकलन, कचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन, हरित क्षेत्रांमध्ये रूपांतर, वापरलेल्या पाण्याची विल्हेवाट, वैयक्तिक घरगुती शौचालय व अशा अनेक बाबीवर त्यांनी मार्गदर्शन केले. यासंबंधी मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने संपूर्ण माहिती संकलित करता येईल याबाबतचे प्रशिक्षण दिले.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी अध्यक्षीय भाष्य करताना म्हणाले, शहरे स्वच्छ व सुंदर आणि कचरामुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवलेला हा रचनात्मक व स्तुत्य उपक्रम असून नागरिकांनीही यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य केले पाहिजे.
उप प्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले म्हणाल्या, स्वच्छ महाराष्ट्र मिशन हे शहरी लोकांसाठी स्वच्छतेचे एक उत्तम मानक ठरत असून यासाठी नागरिक ही स्वच्छता उपक्रमासाठी कटिबद्ध असले पाहिजेत.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रमुख आयोजक मा. विनायक कुलकर्णी,मिरज यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. खंडेराव खळदकर व प्रा. सुरज चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे संचालक प्रा.डॉ. तानाजी चौगले व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा, मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व स्वच्छता मित्र उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा