![]() | |
दानोळीत सोन्या-चांदीची चोरी |
*प्रा.डॉ.महावीर बुरसे : उपसंपादक*
दानोळी : शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे नेमगोंडा बाबगोंडा पाटील यांचे घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी व रविवारीच्या मुदतीत घडली आहे. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे.
याबाबत अधिकृत माहिती अशी, पाटील यांचे घर जैन मंदिरजवळ आहे. यांचे घराचे कुलूप तोडून देवघरातील असलेली तिजोरी लॉकर फोडून मिनी गंठन, चांदीचे ग्लास ४ नग, चांदीचा कळस करंडा, रोख ५ हजार रूपये असा एकूण ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
नागरिकांच्या मधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा