Breaking

बुधवार, ३१ जुलै, २०२४

*सुटा कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने प्राध्यापक हितार्थ संवाद बैठक संपन्न*


जयसिंग कॉलेज येथील संवाद बैठकीत प्राध्यापकांशी सुसंवाद साधताना सुटा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर, अध्यक्ष डॉ. आर.जी. कोरबु,डॉ. गजानन चव्हाण, डॉ. सयाजी पाटील व डॉ. दीपक सूर्यवंशी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : मंगळवार दिनांक २९ जुलै २०२४ रोजी कोल्हापूर जिल्हा सुटा शाखेच्या वतीने प्राध्यापकांचे सर्व प्रश्न व आंदोलनाची टप्पे याबाबत सुटा व प्राध्यापक यांच्यात दुवा साधणारी संवाद बैठक जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे संपन्न झाली. 

        प्रारंभी प्रा. सुधाकर मानकर यांनी सुटा संघटनेची भूमिका विशद केली. यानंतर प्राध्यापकांशी संबंधित प्रश्न अर्थात प्लेसमेंट, नवीन रिक्त पदे भरणे, रजे संदर्भात, एम. फिल. धारकांच्या सेवेबाबत, एम.फुक्टोची भूमिका, एड व्होक सेवा, जुनी पेन्शन योजना, कोर्टात सुरू असलेल्या केसीस संदर्भात, शिक्षण सचिवांची गळचेपी धोरण व अन्य शैक्षणिक बाबी या संदर्भात विस्तृत विवेचन करून प्राध्यापकांशी सुसंवाद साधला.

       सुटा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. आर.जी.कोरबु यांनी एम.फुक्टोच्या आंदोलनाचे टप्पे सांगून सुटा सदस्य प्राध्यापकांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. 

     प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांची व मनातील शंका-कुशंकेचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. सुटा आयोजित ही संवाद बैठक खऱ्या अर्थाने सुसंवादी होण्यास सुखर झाली असल्याबाबतची प्रतिक्रिया उपस्थित असलेल्या सुटा सदस्यांनी व्यक्त केली

        या संवाद बैठकीचे स्वागत, प्रास्ताविक, आभार व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन जयसिंगपूर कॉलेज सुटाच्या वतीने प्रा.डॉ.टी.जी.घाटगे यांनी केले.

     या बैठकीस सुटा कोल्हापूर जिल्हाचे समन्वयक मा.प्राचार्य सुधाकर मानकर,सुटा कोल्हापूर जिल्हा  अध्यक्ष डॉ. आर.जी.कोरबु, सचिव डॉ. गजानन चव्हाण, कार्यकारणी सदस्य डॉ.सयाजी पाटील, डॉ.दिपक सूर्यवंशी व जयसिंगपूर कॉलेज सुटा प्रतिनिधी प्रा.डॉ.टी.जी.घाटगे व उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले व सुटा चे सर्व सभासद प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      शिरोळ तालुक्यातील तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एक कार्यशाळा ऑगस्ट महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा