Breaking

मंगळवार, ३० जुलै, २०२४

भारताचे स्थान जागतिक पटलावर अबाधित ठेवण्यासाठी व गुणवत्तापूर्ण नागरिक घडविण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज : मा. सचिन कुंभोजे यांचे प्रतिपादन*


कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मा. सचिन कुंभोजे, मा. धवल मेहता, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.पी. लोखंडे, डॉ. संजय ओमासेव अन्य मान्यवर 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : महावीर कॉलेजमध्ये दि.16 जुलै 2024 रोजी स्किलिंग युथ फॉर इंटरप्रीनरशिप डेव्हलपमेंट या विषयावर अर्थशास्त्र विभाग,कौशल्य उद्योजकता समिती व  बी.व्होक.डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.प्रमुख पाहुणे म्हणून मा.सचिन कुंभोजे यांनी मार्गदर्शन केले अनेक केस स्टडीज लोकल बिझनेसमन यांच्या यशस्वी गाथा विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या. याप्रसंगी प्राचार्य मा. डॉ.आर पी लोखंडे यांनी अध्यक्षस्थान भूषवले.

   यावेळी मा.सचिन कुंभोजे हे मार्गदर्शन करताना म्हणाले, जागतिक पटलावरील कौशल्य दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन भारताचे स्थान जागतिक पटलावर अबाधित ठेवण्यासाठी व गुणवत्तापूर्ण नागरिक घडविण्यासाठी  कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची गरज आहे. सध्या परिस्थितीत व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी विविध प्रकारची कौशल्य आत्मसात करून ती विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी त्यांनी कौशल्य विकसित करण्यासाठीचे उत्तम मार्गदर्शन केले.

   या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रांमध्ये युवा उद्योजक मा. धवल मेहता यांनी  विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्यावसायिक धोरणे कशी असावीत अशी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दोन्ही युथ आयकॉनी  आपल्या स्वतःच्या अनुभव व उदाहरण  देऊन प्रेरित केले. त्यांच्या  मार्गदर्श ना मुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. 

   अध्यक्ष स्थानावर बोलताना प्राचार्य मा. डॉ.आर पी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये जास्तीत जास्त कौशल्य आत्मसात करावीत असे आवाहन केले.

    ही कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी IQAC कोऑर्डिनेटर डॉ. संजय ओमासे  यांनी विशेष परिश्रम घेतले. कौशल्य उद्योजकता समितीच्या समन्वयक डॉ.अश्विनी कोटणीस व वाणिज्य विभागाकडील श्रीमती संध्या जाधव उपस्थित होत्या.

    कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. संजय ओमासे यांनी केले.आभार डॉ.अश्विनी कोटणीस यांनी मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन काजल भोसले यांनी केले.

    या कार्यशाळेसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा