![]() |
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त मार्गदर्शन करताना प्रा.सौ. रूपाली बस्तवाडे , अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले, प्रा.डॉ. तुषार घाटगे, प्रा.डॉ.सौ. सुपर्णा संसुद्धी व प्रा.डॉ. प्रभाकर माने |
प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये 'जागतिक लोकसंख्या दिनाचा' कार्यक्रम गुरुवार दि. ११ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व पाहुणे प्रा.सौ. रूपाली बस्तवाडे व अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.सौ. विजयमाला चौगुले उपस्थित होते.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने यांनी या कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, या दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना लोकसंख्येची सद्य सद्यस्थिती माहीत देणे,जनजागृती करणे व गुणवत्तापूर्ण लोकसंख्या बनविण्यासाठी सातत्याने समाज प्रबोधन करणे हा यामागचा हेतू होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.सौ. रूपाली बस्तवाडे या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाल्या, देशातील लोकसंख्या देश विकासात्मक व लाभदायक बनवायचे असेल तर देशातील उपलब्ध साधनसंपत्तीचा पर्याप्त वापर करून आर्थिक विकास साधला पाहिजे. मूल जन्माला येताना केवळ पोट घेऊन जन्माला येत नाही तर दोन हात आणि बुद्धीही घेऊन जन्माला येते, त्यामुळे लोकसंख्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहीजे. तरुणाईच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच कौशल्य विकासाला चालना देणारे शिक्षण दिले पाहिजे.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या तरुणांच्याकडे पाहूनच भारत २०२० साली महासत्ता होईल हे स्वप्न पाहिले होते पण ते सत्यात उतरले नाही याचे कारण म्हणजे तरुणांच्या हाताला काम मिळू शकले नाही. भारताला महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिले पाहिजे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यापूर्वी संबंधित क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य शिक्षण तरुण वर्गाला दिले पाहिजे.
प्रा.सौ.बस्तवाडे आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या, आपल्या देशाला जगाच्या केवळ २.४ टक्के भूभाग लाभला असता तरी आपण देशातील ६० ते ६१ टक्के कृषी योग्य भूभागावरच शेती करतो, त्यामुळे शेती क्षेत्र वाढविले पाहिजे.शेती क्षेत्र जलसिंचित केले आणि शेतीचा विकास करून कृषीवर आधारित उद्योगधंद्याची वाढ केली तर देशासमोरील बेरोजगारीची समस्या निश्चितपणे कमी करता येईल आणि देशाची लोकसंख्या देशासमोरील समस्या न राहता देशाच्या आर्थिक विकासाचे साधन होऊ शकेल. सन २०२३ मध्ये जागतिक बँकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. तरीही भारतातील लोकसंख्येची गुणात्मकता वाढीसाठी सकारात्मक व विकासात्मक डोळस नजरेची गरजेचे आहे.
अध्यक्ष स्थानावर बोलताना उपप्राचार्य डॉ.सौ. विजयमाला चौगुले म्हणाल्या, लोकसंख्या वाढीबाबत समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या अतिरिक्त होत असली तरी देशाचा विकास साधण्यासाठी लोकसंख्या नियंत्रित करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाचे आभार डॉ. वंदना देवकर यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रबद्ध सूत्रसंचालन प्रा.कु. माधुरी कोळी व प्रा.सौ.विश्रांती माने यांनी केले. या व्याख्यानाचे उत्तम नियोजन अर्थशास्त्र विभागाने केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास प्रा.डॉ.तुषार घाटगे, प्रा.डॉ.एस.जी.संसुद्धी, डॉ. खंडेराव खळदकर, डॉ. राजेंद्र कोळी, प्रा.कविता चानकने, ,प्रा.सुरज चौगुले,प्रा.कांबळे,प्रा.राठोड ,अन्य प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उत्साही व सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमाचे विद्यार्थी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा