Breaking

शनिवार, ६ जुलै, २०२४

*जयसिंगपूरच्या डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या २७ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड*


डॉ. जे जे मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजचे चेअरमन विजयराज मगदूम,व्हाईस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम,प्राचार्य डॉ. शुभांगी पाटील,कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे,प्रा.पी.पी. माळगे व यशस्वी विद्यार्थी


*प्रा. बाळासाहेब पाटील : उपसंपादक*


 जयसिंगपूर : येथील डॉ. जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या २७ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी ' युनिक रोबोटिक्स अँड ऑटोमेशन पुणे' या कंपनीमध्ये  निवड झाली आहे.अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे यांच्या हस्ते करण्यात आला.

     युनिक रोबोटिक अँड ऑटोमेशन  ही कंपनी कॉस्ट सेविंग सोल्युशन, सायकल टाईम ऑप्टिमायझेशन आणि क्वालिटी सोल्युशन्स मध्ये स्पेशलायझेशन असणारी पुणेस्थित  आहे. एकावेळी एकाच विभागातील २४ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी. माळगे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल डॉ. विजय मगदूम यांनी त्यांचे अभिनंदन केले.

  प्रज्ञा चव्हाण, पुष्पराज जगदाळे,श्रद्धा भोसले,शाईन शिकलगार, सुशांत सुर्वे, सायली अरेकर, तंजीला नदाफ, शालनी कुमारी, निकिता लिपारे,  पूजा पाटील, वैष्णवी पाटील, ऐश्वर्या जगदाळे, रोहित सस्ते, सानिका पाटील, सृष्टी चिवटे, बाळकृष्ण केसरकर, यश रेणुके, रचना सरगर, साक्षी कथले, कृष्णात कोळी, हर्षदा मगदूम, श्रेया करवंदे, पुनम वाघराळीकर, सम्मेद कोल्हे, आदित्य कुलकर्णी, धनश्री चोरगे, व ऋतुजा केकले अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन विभागाच्या शेवटच्या वर्षात शिकत असून कॉलेज कॅम्पस मधून त्यांची नोकरीसाठी निवड झाली.

    निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख प्रा. मंदार कोलप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक  प्रा. अक्षय सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा