Breaking

शनिवार, ६ जुलै, २०२४

*प्राचार्य ताम्हनकर यांची कारकीर्द म्हणजे विलिंग्डन महाविद्यालयाच्या इतिहासातील सुवर्णपान : डॉ.विश्राम लोमटे*


महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉ.विश्राम लोमटे,  सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* 


सांगली : प्राचार्य डॉ.ताम्हनकर यांची विलिंग्डन महाविद्यालयातील कारकीर्द ही विलिंग्डनच्या इतिहासातील सुवर्णपान आहे असे कौतुक उद्गार महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉ.विश्राम लोमटे यांनी काढले. ते वेलणकर सभागृहामध्ये आयोजित प्राचार्य डॉ.ताम्हनकर यांच्या सदिच्छा समारंभामध्ये अध्यक्ष म्हणून बोलत होते. प्राचार्य डॉ.ताम्हनकर हे विलिंग्डन महाविद्यालयाशी 1979 सालापासून म्हणजेच 45 वर्षापासून अनेक अंगानी जोडले आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व हे हरहुन्नरी, अष्टपैलू , सांस्कृतिक, कुशल व विविध संकटावर मात करणारे आहे. त्यांनी आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये  महाविद्यालयाचे दोन वेळा यशस्वी NAAC मूल्यांकन करून महाविद्यालयास सर्वोत्तम असा 'अ' दर्जा प्राप्त करून दिला. शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती युवा महोत्सव यशस्वीपणे संपन्न करून दाखवला. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचेही आयोजन  करण्यात आले होते. त्यांच्याच कारकिर्दीत महाविद्यालयांमध्ये नवीन 8 पदवी व पदव्युत्तर कोर्सेस सुरू झाले. त्यांनी डीएसटी इन्स्पायर कॅम्प महाविद्यालयामध्ये तीन वेळा आयोजित करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध करून दिली. महाविद्यालयाच्या शतक महोत्सवामध्ये विविध नामांकित वक्त्याची व्याख्याने आयोजित करून महाविद्यालयाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. सुरुवातीला विद्यार्थी म्हणून व नंतर प्राध्यापक म्हणूनही त्यांनी महाविद्यालयामध्ये काम केले होते. नंतर ते जयसिंगपूर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले व नंतर 2014 लां महाविद्यालयांमध्ये प्राचार्य पदावर त्यांची सध्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी निवड केली. डॉ. विश्राम लोमटे यांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. 

प्राचार्य डॉ.ताम्हनकर यांना शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ.ठाकूर, डॉ. मनोहर कोरे व सौ. ताम्हनकर मॅडम

     प्राचार्य डॉ.ताम्हनकर यांनी आपल्या मनोगतामध्ये आपला व महाविद्यालयाचा असणारा ऋणानुबंध सविस्तर विशद केला. संस्थेचे सहकारी प्राध्यापकांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य सुविद्य पत्नी सौभाग्यवती उर्मिला यांची समर्थ साथ यामुळेच मी या सर्व गोष्टी करू शकलो असे ते म्हणाले. भविष्यामध्ये ही विद्यार्थ्यांच्या साठी जमेल त्याप्रमाणे मार्गदर्शन करत राहण्याचा मनोदय ही त्यांनी व्यक्त केला.

   या सदिच्छा समारंभाचे आयोजन वेलणकर सभागृहात  महाविद्यालयाच्या स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने करण्यात आले होते. समितीचे समन्वयक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनोहर कोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रा.राजू कागणे, डॉ.पडाळ आजीव सदस्य आर.ए.कुलकर्णी, प्रा.जी.बी.चौगुले, मा.धोत्रे, मा.चिटणीस, पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कणसे, प्रा.संजय ठिगळे, इतर अनेकांनी मनोगत व्यक्त केले.प्रा.संजय ठिगळे, प्रा.पी.बी.बापट,प्रा.के.बी.पाटील,प्रा.पी.सी.पाटील, महाविद्यालयातील विविध घटकांच्या वतीने प्राचार्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. खेडकर उपस्थित होते. या हृद्य सोहळ्याचे आभार आजीव सदस्य प्रा.आर.जे.पाटील यांनी मांडले. तर उत्तम सूत्रसंचालन प्रा. ठोंबरे यांनी केले.

         या सोहळ्यासाठी शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मनोभावे उपस्थित सदरचा सेवानिवृत्ती सदिच्छा सोहळा भावना पूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा