![]() |
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०२४ |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
इचलकरंजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची मतदार यादी २५ जुलै ऐवजी २ ऑगस्टला प्रसिद्ध होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी दिली.
प्रांताधिकारी चौगुले यांनी निवडणूक आयोगाने या तारखेत सुधारणा केल्याचे सांगितले. मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला होता. या निश्चित केलेल्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नियुक्त मतदान केंद्रावर उपस्थित राहणार होते. तसेच मतदार याद्या २५ जुलैला प्रकाशित करून मतदार यादीवर काही हरकती असल्यास किंवा दुरुस्ती नाव वगळायचे असल्यास त्याची प्रक्रिया ९ ऑगस्टपर्यंत चालणार होती. त्याचबरोबर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर २० ऑगस्टला मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे. परंतु निवडणूक आयोगाने तारखीत बदल केल्याने सुधारित तारखे दिवशी म्हणजेच २ ऑगस्ट रोजी मतदान यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा