Breaking

रविवार, २८ जुलै, २०२४

*श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिरातील उत्सव मूर्ती चे मध्यरात्री गावात आगमन*


*श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिरातील उत्सव मूर्ती चे मध्यरात्री गावात आगमन


*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*


जयसिंगपूर : येथील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील संगमावरील अर्थात कृष्णा व पंचगंगा या नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याकारणामुळे श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेलेले आहे. कोयना पाणलोट परिसरामध्ये पडत असलेला पाऊस व पाण्यामध्ये होत असलेली सततची वाढ यामुळे कालच श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरातून श्री टेंबे स्वामींच्या मठामध्ये आलेले होती.

   मध्यरात्री श्री स्वामी महाराज यांचे मठात कृष्णा-पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी आलेने येथील परंपरेनुसार श्रींची उत्सवमूर्ती श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील   दिगंबर खातेदार यांचे घरी मोठया उत्साहात वाद्य गजराच्या व आरती व जयघोषाच्या गजरात नेणेत आली.

   मध्यरात्री संपूर्ण गावामध्ये उत्साहाचे  व भक्तिमय वातावरण होते. यावेळी सुहासिनींनी आरती ओवाळून या सोहळ्याचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा