![]() |
मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले व प्रा.डॉ. तुषार घाटगे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर: अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेजमध्ये बुधवार दि.१० जुलै, २०२४ रोजी मानव्यशास्त्र शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन व स्वागतपर कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले व प्रा.डॉ. तुषार घाटगे उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावर बोलताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिपूर्ण असणारे धोरण आहे.या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थी हा सर्व शाखेसाठी सजग असेल त्याचबरोबर बहुविद्याशाखीय कौशल्य व ज्ञानाच्या माध्यमातून वास्तववादी जगाशी जोडला जाईल. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण हे ज्ञान शाखा वृद्धिगत करणारी व नवीन शैक्षणिक विकासाची नांदी असल्याबाबतही बोलले.
याप्रसंगी IQAC समन्वयक प्रा.डॉ. तुषार घाटगे यांनी कॉलेजमध्ये असणाऱ्या भौतिक व शैक्षणिक सुविधा बाबत मुलांना माहिती दिली. तसेच कॉलेजमध्ये असणाऱ्या विविध समितीच्या कामासंदर्भात थोडक्यात माहिती देऊन त्यामध्ये सहभागी होऊन त्याचा पर्याप्त वापर कसा केला पाहिजे याबाबत जागृत करण्याचा प्रयत्न केला. तसेच कॉलेजच्या नियमावली ची माहिती दिली.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले यांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमल बजावणीबाबत माहिती दिली. तसेच OE,SEC,VEC, CC व CEP या नवीन अभ्यासक्रमाबाबत परिपूर्ण माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले.
डॉ.एम.बी.माने यांनी उपस्थित असणाऱ्या सर्व घटकांचे स्वागत केले. प्रास्ताविकात नवीन शैक्षणिक धोरणा बाबतचा हेतू स्पष्ट केला. आभार प्रा. संतोषकुमार डफळापुरकर यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा. कविता चानकने यांनी उत्तम पद्धतीने केले.
या कार्यक्रमास प्रा.डॉ.सुपर्णा संसुद्धी,डॉ. वंदना देवकर, डॉ. खंडेराव खळदकर, डॉ.सौ. सुजाता पाटील, प्रा.डॉ.जावळे,डॉ. राजेंद्र कोळी,प्रा. सुरज चौगुले, प्रा. राजाराम कांबळे,प्रा. माधुरी कोळी,प्रा. किरण पाटील,प्रा.नवनाथ राठोड व अन्य प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा