Breaking

सोमवार, २९ जुलै, २०२४

*डॉ.जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे संशोधनात उच्च कोटीची गवसणी*


 *डॉ.जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या कॉलेजचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, प्राचार्य व इतर मान्यवर


*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*


     जयसिंगपूर : येथील डॉ.जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली १० पेटंट्स व ०६ कॉपीराइट्स  फाईल्स करण्यामध्ये यश मिळवले आहे.               ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम, व्हॉइस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम  व कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी शैक्षणिक गुणवत्तेसह संशोधनात्मक केलेल्या कार्याबद्दल प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड,डीन आर. एन.डी. डॉ. डी. बी. देसाई,मार्गदर्शक प्राध्यापक व सहभागी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.

            अभियांत्रिकी शिक्षणाचा मूळ हेतू सेवा व संशोधन हा असल्याने समाजामध्ये गरजेनुसार नवीन संशोधनाचा शोध लावून लोकांचे जीवन सुकर करण्याकडे शिक्षणाचा सहभाग राहतो. तथापि अशीच भूमिका नजरेसमोर ठेवून  शेती, इंडस्ट्री, लॅबोरेटरी यांचे  मानव रहित परीक्षणाचे काम रोबोट करू शकतो, ए. आय. द्वारे योग प्रशिक्षण, मॉलमध्ये वापरली जाणारी ॲटोमॅटिक बिलिंग ट्रॉली, स्मार्ट फूड डिलिव्हरी बॉक्स, अंध व्यक्तींसाठी ब्रेली रॉड, ध्वनी प्रदूषण डिटेक्शन, सॅनिटायझर डिस्पेन्सर वेडिंग मशीन, ऑटोमॅटिक मास्क डिस्पोजिंग, स्मार्ट स्पेक्टॅकल्स, फायर फायटिंग रोबोट  व स्मार्ट हेल्मेट फॉर बाईक रायडर्स इत्यादी वरती संशोधन करण्यात आले आहे. सोबतच कॉम्प्युटर व आय.टी. विभागाकडून ०६ कॉपीराईट फाईल करण्यात आले आहेत.

         सदरहू संशोधनात्मक पेटंट साठी डॉ. डी.बी. देसाई, डॉ. एस. बी. पाटील, प्रा. एम. यु. फुटाणे, प्रा. एम. एम. कोलप, प्रा. आर. ए. भारतीय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा.पी. व्ही.कोठावळे , एस. ए.नरदे , जे.टी.पाटील,एस. जे.चौगुले व एस. बी.होळकर या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनचे र्कॉपीराईट फाईल झाले आहेत. विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या समन्वयातून झालेल्या संशोधनात्मक कार्यास व्यवस्थापनाकडून मोलाचे सहकार्य मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा