Breaking

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये शिक्षक-पालक सहविचार सभा विचार मंथनाच्या माध्यमातून संपन्न*

 

पालक सभेत मार्गदर्शन करताना प्रा. आप्पासाहेब भगाटे, अध्यक्षस्थानी डॉ. महावीर अक्कोळे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे


*प्रा.संदीप राजमाने : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे शिक्षक व पालक सहविचार सभा आशावादी व रचनात्मक विचार मंथनाच्या माध्यमातून संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे उपस्थित होते.

    पालक सभेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.आप्पासाहेब भगाटे (स्थानिक समिती सदस्य) यांनी उपस्थित सर्व पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचे व त्याचे उत्तम नियोजन यासंबंधी माहिती दिली. काळाच्या ओघात बदलत्या शैक्षणिक परिपेक्ष मध्ये पालकांची भूमिका काय? व कशी असावी याबाबत त्यांनी प्रबोधन केले. पालक बैठकीचे महत्व विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कसे उपयोगी आहे हे पटवून दिले.

    डॉ.अक्कोळे अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले, सद्यस्थितीत शिक्षणाचा अर्थ व्यापक बनत असून यासाठी पालकांनी जागृत राहणे गरजेचे आहे. याबाबत त्यांनी समस्त पालकांना शैक्षणिक गुणवत्ता व आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले.

    प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी महाविद्यालयात असणाऱ्या सोयी सुविधा व कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मनोगतातून व्यक्त केला.प्रा.आर.आर.कोरे यांनी विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या JEE,CET व NEET या परीक्षेविषयी  उत्तम मार्गदर्शन केले.तर प्रा.एम.ए.शिंगे यांनी कॉलेजमध्ये सुरू असलेल्या स्पेशल बॅच संबंधी, प्रा.सौ.व्ही.जे.पाटील यांनी कॉम्प्युटर सायन्स व इलेक्ट्रॉनिक सायन्सची सविस्तर माहिती दिली.

      उपप्राचार्य प्रा.बी.ए.आलदर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा.सौ.ए.ए पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन सौ.व्हि.एस‌ पाटील यांनी केले. 

  या सभेसाठी पालक वर्ग, सर्व प्राध्यापक वृंद तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. पालक वर्गातून या सभेबाबत समाधान व आनंद व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा