Breaking

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

*कराडच्या शामगाव घाट व शंभू महादेव परिसरात शासनाचे सर्व घटक व युवकांच्या माध्यमातून वृक्षारोपण*


वृक्षारोपण करताना सर्व प्रशासकीय अधिकारी, एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. अभय पाटील व विद्यार्थी 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने :मुख्य संपादक*


कराड :  कराड तालुक्यातील शंभू महादेव व घाट परिसरात वन जमिनीवर राजा शिवछत्रपती सामाजिक संस्था, वन विभाग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी राज्याचे गृहसह सचिव राजवैभव घाटगे, वन विभागाचे तुषार नवले, राजा शिवछत्रपती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक सुरेश पोळ, सरपंच विजय पाटोळे, तसेच विद्यालय, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक ,प्राध्यापकवृंद, शासकीय कर्मचारी आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

     प्रारंभी शामगाव गावातून वृक्ष दिंडी काढून जनजागृती करण्यात आली. शंभू महादेव व घाट परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कराडचे सद्‌गुरू गाडगे महाराज कॉलेज, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण, शामगावचे ओंकनाथ विद्यालय, साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद व सामाजिक व संस्था अध्यक्ष,शाळांमधील शेकडो विद्यार्थी व शिक्षकांनी भरपावसात वृक्षारोपणाच्या माध्यमातून माझी वसुंधरा वृद्धिगत करण्याचं काम केले. यावेळी वड, पिंपळ, शिवण, सागवण, करंज, जांभळ आदी शेकडो वृक्षांच्या रोपांचा समावेश होता. 

   यावेळी समस्त घटकांकडून सदर उपक्रमाचं कौतुक करण्यात आले.


*(सुरेश पोळ, राजा शिवछत्रपती सामाजिक संस्था अध्यक्ष)*

     पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्येक सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला पाहिजे. वृक्षारोपणाचा हा उपक्रम म्हणजे रचनात्मक कामाच्या माध्यमातून चिरंतन विकासाला साथ देणारा महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. विशेष करून सातारा, पाटण व कराड येथील कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह सर्व घटकांची उत्स्फूर्त व उत्तम साथ मिळाली आहे. यामध्ये विशेष करून राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी यांचा उल्लेख करावा लागेल.

      शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ.तानाजी चौगले यांची प्रेरणा, सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

    राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा