Breaking

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात व आनंदात साजरा*


ध्वजारोहण करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, खजिनदार पद्माकर पाटील, बाळासाहेब इंगळे,डॉ. शीतल पाटील, डॉ. धवल पाटील, सर्व पदाधिकारी व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

     संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.तिरंगा च्या सन्मानार्थ देशभक्तीपर गीत व नृत्य सादरीकरण करण्यात आले.या प्रसंगी एन.सी.सी. व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यानी पथसंचलन केले. अनेकांत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाषणे व  कवायतीचे सादरीकरण करुन उपस्थितीच्याकडून वाहवाह मिळविला. प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी एन.सी.सी.छात्र सैनिकांना व कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थ्यांना शपथ प्रदान केली.

     डॉ. सुभाष अडदंडे, मा. पद्माकर पाटील, शशांक इंगळे, डॉ. शितल पाटील, डॉ.धवल पाटील, प्रा.अभिजीत अडदंडे, संस्थेचे सन्माननीय सदस्य व प्राचार्य डॉ.मांजरे व मुख्याध्यापिका प्रिया गारोळे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी संपादक प्रा.डॉ. टी.जी. घाटगे व उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले उपस्थित होते.

     दरवर्षीप्रमाणे अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने  उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व सेवकांना मोफत जिलेबी वाटप केले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन एन.सी.सी. ऑफिसर लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, कार्यालयीन अधीक्षक ए.बी. कांबळे यांनी केले. बाळगोंडा पाटील व प्रा. सुनिल चौगुले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा