![]() |
पीएच.डी.संशोधक विद्यार्थी डॉ. रविशंकर रमेश आंबी व पीएच.डी. मार्गदर्शक प्रा.डॉ.आर.डी.माने (जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर) |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरचे प्रा.डॉ. रविशंकर रमेश आंबी यांना भौतिकशास्त्र विषयातून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. 'स्टडीज ऑन मेटल ऑक्साईड एनआयओ कोटेड झेडएनओ थीन फिल्म फॉर गॅस सेन्सिंग एप्लीकेशन' या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला. त्यांना जयसिंगपूर कॉलेजचे भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.आर.डी.माने यांचे मार्गदर्शन लाभले तसेच आंबी यांनी दोन इंटरनॅशनल पेपर आणि पेटंट पब्लिश केले आहेत. तसेच आय.आय. टी. बॉम्बे कडून फंडिंग आणि महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूर कडून फेलोशिप प्राप्त झाली.
प्रा.डॉ. रविशंकर आंबी हे विद्यार्थी दशे पासून प्रामाणिक, हुशार व संशोधक वृत्तीचे होते. शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद गावचे ते सुपुत्र असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले.आई सौ. राजश्री व वडिल रमेश आंबी यांचे आशीर्वाद व दिलेल्या संस्काराच्या माध्यमातून आपला मुलगा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सातत्याने राहण्यासाठी आंबी परिवाराने खूप मेहनत घेतली. तसेच त्यांच्या गुरुवर्यांनी केलेला संस्कारक्षम ज्ञानदान व अध्यापन कौशल्यामुळे ते संशोधनात्मक कार्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आणि त्याचा अंतिम परिपाक म्हणून उच्चशिक्षण क्षेत्रातील पीएच.डी. पदवी संपादन केली.डॉ. रविशंकर आंबी यांना कॉलेज जीवनापासून प्रा.डॉ.आर.डी.माने यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा मिळाली. तसेच कॉलेजचे प्राध्यापक वृंद, कॉलेजचे कार्यालयीन अधीक्षक ए.बी. कांबळे व इतर सर्व प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
डॉ. आंबी यांचे सर्व घटकांकडून विशेषतः शिरोळ तालुक्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा