![]() |
| सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना विद्यमान अध्यक्ष प्रा.के.बी. पाटील, पतसंस्थेचे संस्थापक डॉ. सुभाष अडदंडे व उपस्थित सर्व संचालक |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जयसिंगपूर ची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी जयसिंगपूर कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली.
प्रारंभी अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रा.के.बी.पाटील यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले. प्रास्ताविकेच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. पतसंस्थेचे संस्थापक डॉ. सुभाष अडदंडे यांनी पतसंस्था स्थापनेमागचा हेतू स्पष्ट करीत पतसंस्थेच्या सक्षमीकरणासाठी समग्र दृष्टिकोन मांडला.
पतसंस्थेचे व्हॉईस चेअरमन प्रा.पी.सी.पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा मांडला. पतसंस्थेचे मॅनेजर राहुल पाटील यांनी २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर विषय पत्रिकेवरील विषय मांडले.त्यास सभासदांनी सर्वानुमती मंजुरी दिली.
यावेळी अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने डॉ. सुभाष अडदंडे यांचा वाढदिवस साजरा करताना आला. तसेच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या सभासद प्राध्यापकांचा व अनेक क्षेत्रात विविध पदावर निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
या सभेचे आभार संचालिका प्रा.डॉ. विजयमाला चौगुले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या सभेस तज्ञ संचालक महावीर पाटील, प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, संचालक प्रा.एम.एस.पाटील, संजय चावरे, सुहास हिरुकडे, प्रदीप सुतार व हिरालाल पवार उपस्थित होते. सदर सभेस सभासदांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा