![]() |
डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, जयसिंगपूरचे कॅम्पच्या माध्यमातून निवड झालेले विद्यार्थी |
*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या ११ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे टी.सी.एस. व कॅप जेमिनी या नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना वार्षिक रु. लाखांमध्ये ३.३६, ४. ० व ७. ० लाखाचे पॅकेज असून सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून त्यांची निवड झाली आहे.
महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागाचे प्रथमेश कुंभार, दीप कुलकर्णी, बालाजी झारे ,मिलिंद होडगे पाटील, प्रसन्न चौगुले या विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( टी. सी. एस.) मध्ये निवड झाली आहे. तर कम्प्युटर विभागाच्या श्रेया ठोंबरे, भक्ती कुलकर्णी, एम.सी. ए.विभागाचे पूजा म्हेत्रे व साक्षी भंडारे या विद्यार्थ्यांची निवड कॅप जेमिनी मुंबई या कंपनीमध्ये निवड झाली असून अवंतिका जांभळे या विद्यार्थिनीला वरील दोन्ही कंपनीचे नोकरीसाठी ऑफर मिळाली आहे.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे, प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी.पी. माळगे, डिपार्टमेंटल ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर, विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे सहकार्य मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा