Breaking

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

*अनेकांतचा विद्यार्थी आर्यन औताडे 'निपुण जिल्हास्तरीय स्पर्धेत' ठरला चॅम्पियन*

 

 निखिल इंगळे, सी.ई.ओ प्रा.अभिजीत अडदंडे, मुख्याध्यापिका प्रिया गारोळे,भारती पाटील व निर्मला चव्हाण


*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थ्यांची ‘निपुण जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत उत्तम कामगिरी करून यश मिळवले आहे.

   या स्कूलमध्ये गणितातील अद्यावत ज्ञान  ‘अबॅकस’ च्या माध्यमातून दिले जाते. याच परीक्षेच्या धर्तीवर ‘निपुण जिल्हास्तरीय स्पर्धा’ यांच्यातर्फे घेण्यात येणा-या परीक्षेमध्ये आर्यन औताडे हा विद्यार्थी चॅम्पियन ठरला आहे. देवराज बलदवा हा तिस-या क्रमांक पटकविला आहे.अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावली. यामध्ये सूर्यांशू शिंदे, आस्मी पाटील, विहान वाघमोडे, विक्रांत पाटील, रिध्दी उपाध्ये, अद्विता मगदूम व स्वरूप कुंभार हे होते.

सदरच्या मुलांचे सत्कार व शुभेच्छा प्रदान करण्यासाठी शाळा निमंत्रित सदस्य मा.श्री.निखिल इंगळे, सी.ई.ओ प्रा.अभिजीत अडदंडे, मुख्याध्यापिका प्रिया गारोळे, श्रीमती भारती पाटील व सौ. निर्मला चव्हाण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा