Breaking

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

*जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 'हर घर तिरंगा' अभियानाची भव्य रॅली संपन्न*


हर घर तिरंगा रॅलीत सहभागी झालेले सामान्य नागरिकांपासून ते एन एस. एस. स्वयंसेवक विद्यार्थी

*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  जयसिंगपूर येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शासन पुरस्कृत "हर घर तिरंगा" अभियानांतर्गत नुकतीच एक भव्य  रॅली आज १४ जानेवारी,२०२४ रोजी आयोजित करण्यात आली.

    राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर कॉलेज ते गांधी चौक व क्रांती चौकात रॅलीचा समापन करण्यात आले.या रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला.ज्यामध्ये देशभक्तीपर गीतांच्या साथीने तिरंग्याचे ध्वज धारण करून विद्यार्थी व नागरिकांनी मार्गक्रमण केले.


         आरटीओ पोलीस कर्मचारी मा.कांबळेसाहेब

    या रॅलीचा उद्देश प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावणे आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणे होता. जयसिंगपूरातील क्रांती चौकात देशभक्तीपर गीतगायनाने,तिरंग्याचे महत्त्व प्रस्तुत करून त्याचा आदर करण्याच्या बाबतीत नागरिकांना जागरूक करण्यात आले. 

     या तिरंगा रॅली ची वैशिष्ट्ये जयसिंगपूर शहरातील अनेक व्यापाऱ्यापासून ते फळ-भाजीपाला विक्रेते, फुल विक्रेते, सामान्य नागरिक, छोटे-मोठे अनेक कारागीर, एम.एसई.बीचे कर्मचारी, व्यापारी, रिक्षा चालक, केळीवाले, हॉटेल व्यावसायिक, कापड दुकानदार, सिक्युरिटी गार्ड्स, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधू व सर्व धर्मातील नागरिकांनी स्वतः सहभागी होऊन तिरंगा ध्वज धारण करीत मार्गक्रमण केले.या रॅलीत तिरंग्याच्या सन्मानार्थ घोषणा देण्यात आल्या. 


        हिंदुस्तान गारमेंट पोरवाल बंधू व कारागीर बंधू


     या रॅलीमध्ये पत्रकार बंधू राजूभाई सय्यद,डॉ.सुभाष सामंत, चंद्रकांतबापू जाधव घुणगीकर,सुनील पाटील, हिंदुस्तान गारमेंट(पोरवाल बंधू),भोजणे, आरटीओ पोलीस  कांबळे साहेब, उपप्राचार्य डॉ.एन.एल.कदम, एन.एस.एस.कार्यम अधिकारी डॉ. प्रभाकर माने, डॉ. खंडेराव खळदकर व एनएसएस प्रतिनिधी रोहन लाले, ऋतुजा सावंत, वीर कडाले व स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा