![]() |
रक्तदात्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे,अशोक शिरगुप्पे व प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे कॉलेजच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त व क्रांती दिनाचे औचित्य साधून आज शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट,२०२४ रोजी हिंदमाता प्रकाशबापू ब्लड बँक सांगली यांच्यामार्फत कॉलेजच्या कॅम्पस मध्ये १०८ रक्तदात्यांनी रक्तदान करून क्रांतीकारांना अभिवादन केले. याप्रसंगी १०० वेळा रक्तदान केल्याबद्दल बंडू उर्फ शुक्राचार्य उरूणकर यांचा विशेष सत्कार डॉ.एस.बी. अडदंडे यांचे हस्ते करण्यात आला.संस्थेचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे, अशोक शिरगुप्पे व प्राचार्य डॉ.सुरत मांजरे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर शहर व परिसरातील सर्व नागरिक व विद्यार्थ्यांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला साथ देत जयसिंगपूर शहरातील नागरिकांनी, कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी- सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व एनसीसी कॅडेटसनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांनी केले. याप्रसंगी ब्लड बँकेचे संचालक मा.गवळी,मा. लोंढे व डॉ. सरगर,उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.व्ही.चौगुले, प्राध्यापकवृंद, ब्लड बँकेचा स्टाफ व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, डॉ. प्रभाकर माने व लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा