Breaking

बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

*संभाजीपूरातील सिद्धेश्वर कॉलनीच्या प्लॉटधारकानी प्रशासनास दिला आमरण उपोषणाचा इशारा ; सांडपाण्याचे व्यवस्थापन चुकीचे व अनधिकृत पद्धतीने*


आमरण उपोषणास बसण्यासाठी लेखी निवेदन देताना सिद्धेश्वर कॉलनीतील प्लॉट धारक व निवेदन स्वीकारताना सरपंच सचिन खुडे 
 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : मौजे संभाजीपूर ता.शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील सांडपाण्याचे नियोजनशून्य व्यवस्थापन व अनधिकृत पद्धतीने पाण्याची विल्हेवाट लावून संभाजीपुरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासना कडून केला जात असल्याने सिद्धेश्वर कॉलनीतील प्लॉट धारकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

     संभाजीपूर ग्रामपंचायतीच्या संपूर्ण हद्दीतील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. सद्यस्थितीत संभाजीपूरातील सांडपाणी व्यवस्थापन व प्रक्रियेचे नियोजन नसल्याने कुणाच्याही गटारीचे सांडपाणी कुणाच्याही हद्दीत सोडले जात आहे. यासाठी ग्रामपंचायतीने सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा व गटारीचे योग्य पद्धतीने नियोजन करावे यासाठी येथील नागरिकांनी तोंडी व लेखी निवेदनाद्वारे वारंवार कळविले होते.परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेतली नाही.

   फळ रोपवाटिकेच्या भिंतीला भगदाड पडून जे सांडपाणी गट नंबर 51/5 च्या खाजगी मालकीच्या हद्दीत सोडले जाते ते सांडपाणी बंद करून नकाशामध्ये दाखवल्या प्रमाणे गटारीचे नियोजन ग्रामपंचायतीने करावे यासाठी सिद्धेश्वर कॉलनी गट नंबर 51/5 चे प्लॉट धारक  सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 पासून संभाजीपूर ग्रामपंचायती समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीस दिला आहे.

       यासाठी सिद्धेश्वर कॉलनीतील प्लॉटधारक महेश दत्तात्रय पोरे,अभिजित नरसाप्पा चराटे,शेखर शिवाजी जगदाळे व बाळासाहेब जाधव आमरण उपोषणासाठी बसणार  आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा