Breaking

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

*श्रीमती विद्या तुकाराम पाटील यांची सेट परीक्षेमध्ये स्पृहणीय यश ; इंग्रजी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण*

 

श्रीमती विद्या तुकाराम पाटील (प्राथमिक शिक्षिका),
शिरोळ


 *प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*


 शिरोळ : केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगर शिरोळ, येथील सहाय्यक शिक्षिका  श्रीमती विद्या तुकाराम पाटील  ७  एप्रिल २०२४ रोजी झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सेट परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळविले आहे.

     श्रीमती पाटील यांचे प्राथमिक शिक्षण सैनिक टाकळी च्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेले आहे.माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल सैनिक टाकळी.तर दत्त कॉलेज,कुरुंदवाड येथून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी डी.एड.ची पदवी मिळवली.  बी.ए. व एम.ए.या पदवीचे उच्च शिक्षण शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. 

   सन २००९ पासून त्या जिल्हा परिषद शाळेच्या सेवेमध्ये रुजू झाल्या. ११ वर्षे कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये वांडरेवस्ती येथे कार्यरत होत्या.सन २०२० मध्ये सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांची बदली झाली व जिल्हा परिषद कोल्हापूरच्या शाळेमध्ये त्या रुजु झाल्या.सध्या त्या शिरोळ येथील  केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगर या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचा शैक्षणिक प्रवास हा खूप खडतर आहे त्या डी.एड, बी.ए ,एम.ए, बी.एस्सी. व एम.एस्सी. पदवी संपादन करून इंग्रजी विषयातील सेट परीक्षेची तयारी सुरू केली, जिद्दीने सेट परीक्षेत यश मिळवले.

    जिल्हा परिषदेच्या शिक्षिका ते थेट सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेतील यशा चे विशेष कौतुक सर्वच स्तरातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा