Breaking

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

*जयसिंगपूर कॉलेजच्या वतीने पीडित बालिका व अन्य महिलांना न्याय मिळण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाणेस दिले निवेदन*

 

 पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उप प्राचार्य डॉ. विजयमाला चौगुले, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने व मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने बदलापूर येथील लैंगिक पीडित बालिका-अन्य पीडित महिलांना न्याय मिळावा व आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी  आज  मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी सर्वांच्या वतीने जयसिंगपूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले व एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर व डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते.

    या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, बदलापूरमधील अलीकडच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एका शाळेतील सफाई कामगाराने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात नागरिकां कडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून मोठ्या प्रमाणावर निदर्शनेही होत आहेत.

     बदलापूर येथे लहान बालिकेवर झालेल्या शारीरिक अत्याचारा विरोधात व आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी. तसेच समाजात बालिका व महिलांच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार होत असून अशा घटना घृणास्पद, निंदनीय व संताप जनक आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने तातडीने  अशा सर्व प्रकरणाचे जलदगतीने फास्टट्रॅक न्यायालयामार्फत निपटारा करावा.

  बलात्कार हा फक्त एका व्यक्तीवर किंवा कुटुंबावर होणारा अन्याय नसून, तो संपूर्ण समाजाच्या जबाबदारीचा प्रश्न आहे. महिला व बालिका  ही आपल्या समाजाचे भविष्य आहे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांना तात्काळ थांबवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

   सरकारने या गुन्ह्यांच्या विरोधात कडक कायदे लागू केले आहेत, परंतु केवळ कायदे कठोर करून हा प्रश्न सुटणार नाही. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होऊन गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी  ही अपेक्षा आहे.

      यावेळी जयसिंगपूर कॉलेजचे एन.एस.एस.चे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा