Breaking

सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

*दूरशिक्षण केंद्राचा ऑनलाइन माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन*


शिवाजी विद्यापीठ दूरदर्शन केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन मेळावा


*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील बी.ए.,बी.कॉम., एम.ए.,एम.कॉम.,एम.एस्सी.(गणित) व एम.बी.ए. या अभ्यासक्रमातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४  मधील विद्यार्थ्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा बुधवार दि.०७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा.ऑनलाइन पद्धतीने आयोजित केल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली.

      शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डॉ.ए.एम.गुरव “पदवी व पदवीव्युत्तर नंतरचे  करिअर" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी अध्यक्षस्थान संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे भूषवणार असून उपकुलसचिव श्री.व्ही.बी.शिंदे  उपस्थित राहणार आहेत.तरी

https://shivajiuniversity.webex.com/shivajiuniversity/j.php?MTID=m37909fca0ca6837907167012e1767daa 

     या वेबेक्स लिंकद्वारे विद्यार्थ्यांनी  सहभागी व्हावे, असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा