Breaking

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४

*जयसिंगपूरच्या डॉ. जे. जे. मगदुम अभियांत्रिकीच्या सोळा विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत समावेश*


डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, जयसिंगपूर


*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*


  जयसिंगपूर :   शिवाजी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या २०२३-२४ मधील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या डॉ. जे. जे मगदूम अभियांत्रिकीच्या एकूण १६ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या  गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्याचा बहुमान पटकावला आहे.

     सिविल इंजिनिअरिंग  विभागातून प्रथमेश कांबळे यांने ०४ थी रँक मिळवली तर जुवेरिया मुजावर हि विद्यापीठाच्या पाचव्या रँक मध्ये उत्तीर्ण झाली आहे. झुरेन गुपिया लॅटिन लुंग यांनी सहावी रँक मिळवली आहे. कंप्यूटर विभागाची निकिता माने हिने दुसरी रँक मिळवून यश संपादन केले तर ई.टी. सी. विभागाच्या हर्षदा मगदूम हिने पाचवी रँक मिळवली. आय.टी. विभागातून अवंतिका जांभळे विद्यापीठात अव्वल रँक मिळवून यशस्वी झाली. वैष्णवी लाड, सायली पाटील, संग्राम सिंह भूसणार, साक्षी पाटील, प्रतीक्षा सातपे, सोनल मेथे, वैभवी गायकवाड, प्रीती कदम, शितल साळुंखे व यशोदा कोलपे यांनी अनुक्रमे २ ते १० रँक मिळवून मेरिट लिस्ट मध्ये अव्वल राहण्याचा बहुमान पटकावला आहे.

        याच वर्षी महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा( ऍटोनॉमस ) दर्जा मिळाला असून शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यापीठात अग्रेसर राहून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे असे उद्गार ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना काढले. प्रसंगी  कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे, प्राचार्य डॉ. गोपाळ मुळगुंद, डीन-अकॅडमिक प्रा. ए. एस. साजणे, डीन स्टुडन्टस प्रा. पी. पी. पाटील व विभाग प्रमुख उपस्थित होते.

      या सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा