![]() |
हेमंत सुलोचना मच्छिंद्र कांबळे, अकिवाट |
*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*
अकिवाट : येथील हेमंत मच्छिंद्र कांबळे यांनी 7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित सहाय्यक प्राध्यापक पात्रतेसाठी असलेल्या अर्थात सेट परीक्षेत इंग्रजी विषयात सुयश संपादन केले.
हेमंत कांबळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकिवाट येथील विद्यासागर हायस्कूल येथे झाले आहे.बी.ए.इंग्रजी पदवीचे शिक्षण कुरुंदवाड येथील सहकारभूषण एस. के. पाटील कॉलेजमध्ये पूर्ण केले. एम.ए.इंग्रजी पदव्युत्तर शिक्षण हे वालचंद कॉलेज अर्जुननगर (निपाणी) येथे पूर्ण केलेले आहे. सध्या ते एकसंबा येथे बसवज्योती डिग्री कॉलेज येते इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
![]() |
सेट परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
हेमंतचे आई सुलोचना व वडील मच्छिंद्र कांबळे हे शेतमजूरांचे काम करतात.दोघेही अल्प शिक्षित असूनही आपला मुलगा प्राध्यापक व्हावा म्हणून दोघांनीही कठोर परिश्रम घेतले. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना हेमंतने मिळवलेल्या यशाचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने हेमंत कांबळे यांचे अभिनंदन!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा