Breaking

बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

*जयसिंगपूर कॉलेजचे प्राध्यापक डॉ. रवींद्र माने यांची प्लेसमेंटद्वारे प्रोफेसर पदी निवड*


प्रोफेसर (डॉ.) रवींद्र दामोदर माने, जयसिंगपूर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी चे जयसिंगपूर कॉलेजचे प्राध्यापक डॉ. रवींद्र दामोदर माने यांची शिवाजी विद्यापीठाच्या प्लेसमेंटद्वारे फिजिक्स विषयीतून प्रोफेसर पदी निवड झाली आहे.

      प्रा.डॉ. माने यांनी जवळपास 31 वर्ष प्रदीर्घ सेवा करून आजही अध्यापन व संशोधनाचे काम अविरतपणे सुरू आहे. भौतिक विषयातील एक अभ्यासू संशोधक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी दोन संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहे. तसेच विशेष करून 1 संशोधने पेटंट साठी प्रकाशित झाली आहेत. सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्यांने पीएच.डी.पदवी पूर्ण केली असून सध्या 3 विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे जवळपास आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर संशोधन पेपर प्रकाशित असून त्यांनी 36 कॉन्फरन्स मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. विशेष करून श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ते सहभागी झाले होते. आपल्या ज्ञान, अध्यापन व संशोधन अनुभवाचा वापर करून त्यांनी 3 पुस्तके प्रकाशित केली आहेत. डॉ. माने यांनी संशोधनातील 6 उच्चस्तरीय संस्थेची लाईफ मेंबरशिप बहाल करण्यात आली आहे. दोन अभ्यास मंडळावर ते कार्यरत आहेत

a

       मुळात डॉ.आर. डी.माने हे एक अभ्यासू, कष्टाळू, शांत-संयमी व विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून सुपरिचित आहेत. अनेक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्नाला न्याय देण्याचे काम केले आहे. समाजातील वंचित घटकांचा आवाज बनण्याचं काम केले आहे. विविध समाजातील अनेक गरीब व हुशार विद्यार्थ्याना आर्थिक स्वरूपात मदत केली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी आपली कारकीर्द रचनात्मक कामाच्या माध्यमातून यशस्वीपणे पूर्ण केली आहे.एक पुरोगामी व प्रामाणिक प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे.भौतिक शास्त्राचे माजी प्राध्यापक डॉ. मुरलीधर डोंगरे हे गुरुस्थानी होते. त्याच्या यथोचित मार्गदर्शनामुळे संशोधनाच्या कार्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.

      डॉ.माने यांच्या मातोश्री सोनाई व वडील दामोदर माने यांच्या आशीर्वादाने व त्यांनी दिलेल्या संस्काराच्या माध्यमातून त्यांची जडणघडण झाली आहे. त्यांचे मोठे बंधू महावीर माने हे माजी शिक्षण संचालक (महाराष्ट्र राज्य) म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.तर शिक्षक दिलीप माने व कालवश कुमार माने व नरेंद्र माने (कृषी अधिकारी) हे त्यांचे  बंधूगण आहेत. त्यांची प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्य यामुळे ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहिले.त्यांच्या पाठीशी 3 भगिनी असून त्यांची पत्नी सौ. स्वाती रवींद्र माने यांची त्यांना उत्तम साथ मिळाली आहे.डॉ. माने यांची कन्या रसिका व रुजवी याही आपल्या शैक्षणिक क्षेत्रात कार्यमग्न आहेत. 

     डॉ. माने यांना जयसिंगपूर कॉलेज स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे , संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे व खजिनदार पद्माकर पाटील  व संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांची प्रेरणा , कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कॉलेजमधील प्राध्यापक सहकारी, प्रशासकीय कर्मचारी व सेवक यांचे ही विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा