![]() |
संचालक,डॉ. तानाजी चौगले, (राष्ट्रीय सेवा योजना कक्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' हे नवीन अभियान सुरू करण्यात आले असून हे अभियान म्हणजे देश प्रेमाचे उच्च कोटीचे दर्शन असल्याबाबत मत शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी प्रतिपादित केले. ते शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक विद्यार्थ्यांना प्रेरित करणे व कुशल पद्धतीने संचालन होण्यासाठी मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे.
डॉ. चौगले पुढे म्हणाले,या अभियानाचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना प्रज्वलित करणे आणि राष्ट्रीय ध्वजाच्या प्रती वचनबद्धता व्यक्त करणे असा आहे. हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून या मोहिमेअंतर्गत देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, आणि इतर संस्थांमध्ये तिरंगा ध्वज फडकवण्याचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. शिवाजी विद्यापीठात हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून सेल्फी विथ तिरंगा यासाठीची अर्थात सेल्फी पॉईंटची व्यवस्था केली आहे.
हर घर तिरंगा हे अभियान किंवा ही मोहीम केवळ शहरी भागांपुरती मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातही पोहोचवण्याचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. विशेषत; युवा वर्गाने या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी आणि आपल्या स्वातंत्र्याचा अभिमान व्यक्त करण्यासाठी ही मोहीम एक प्रभावी साधन ठरत आहे.
'हर घर तिरंगा' मोहिमेने राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला आहे आणि समाजातील सर्व स्तरांमध्ये देशभक्तीची भावना वाढवण्याचे काम केले आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनीही पुढाकार घेतला आहे.
सोशल मीडियावरही या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, जिथे नागरिक तिरंग्यासोबतचे आपले फोटो आणि देशभक्तीपर गाण्यांचे व्हिडिओ शेअर करत आहेत. आपणही यासाठी कटिबद्ध राहण्याबाबत समस्त घटकांना आवाहन संचालक तानाजी चौगले यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा