Breaking

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

*देशातील नीतिमान युवक व कौशल्यपूर्ण पिढीसाठी सर्वसमावेशक विकास व सक्षम नियोजनाची गरज : प्राचार्य डॉ. जयवंत इंगळे*


बीजभाषक म्हणून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. जयवंत इंगळे, प्राचार्य डॉ. शिवाजी भोसले, प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, उप प्राचार्य प्रा.जे. ए.यादव व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


तासगाव : जागतिक पटलावर देशाचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी, देशातील नीतिमान युवक व कौशल्यपूर्ण पिढीसाठी सर्वसमावेशक विकास व सक्षम नियोजनाची गरज असल्याचे प्रतिपादन अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन व बीजभाषक प्राचार्य डॉ. जयवंत इंगळे यांनी आपल्या बीजभाषणाच्या माध्यमातून एक दिवसीय कार्यशाळेत व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, उपप्राचार्य डॉ.कुलकर्णी व कार्यशाळेचे समन्वयक उपप्राचार्य,प्रा.जे.ए.यादव उपस्थित होते.

   डॉ. इंगळे पुढे म्हणाले, शेती क्षेत्रात नवीन व्युहरचनेची गरज, भारतातील आर्थिक विषमता, सामान्य घटकापर्यंत विकास न पोहोचणे, प्रचंड दारिद्र्य, सर्वसमावेशक विकासाचा अभाव, स्त्री- पुरुष विषमता, प्रादेशिक  विषमता, कल्याणकारी विकासाचा अभाव व जागतिक पटलावर होणारी विकासाची पीछेहाट, बेकारीचा व महागाईचा भस्मासुर या अशा अनेक महत्वपूर्ण आर्थिक पैलू वर प्रकाश टाकण्याचे काम पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे शनिवार दिनांक १० ऑगस्ट,२०२४ रोजी बी.ए.भाग ३ 'विकासाचे अर्थशास्त्र व नियोजन' सेमिस्टर ५ व ६ या बदललेल्या अभ्यासक्रमाची एकदिवसीय कार्यशाळेत बोलताना केले.

 

कार्यशाळेतील महत्त्वाचे क्षणचित्रे

 डॉ. राहुल शंकर म्होपरे यांनी साधन व्यक्ती म्हणून कार्यशाळेच्या प्रथम सत्रात विकासाचे अर्थशास्त्र या बदललेल्या अभ्यासक्रमावर चौफेर व उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले. सर्व समावेशक विकासाची संकल्पना व्यावहारिक पद्धतीने व विद्यार्थी केंद्रित कशा पद्धतीने शिकवावे याचे उत्तम मार्गदर्शन केले.सत्राध्यक्ष म्हणून विलिंग्डन कॉलेजचे डॉ. मनोहर कोरे यांनी काम पाहिले.

     व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन व श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडीचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी दुसरा सत्रात साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाले, समस्त प्राध्यापक घटकांना मुळात अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी माहीत असणे गरजेचे आहे. तसेच उत्तम अभ्यासक्रमाबाबत स्वेच्छेने बदल सुचवणे आवश्यक आहे. बदललेल्या अभ्यासक्रमा बाबतची सर्व कश बाबीवर प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले, अभ्यासक्रमातील महत्वपूर्ण बाबी कशा पद्धतीने हाताळल्या पाहिजेत व त्याचबरोबर नवीन संकल्पना अवगत करून विद्यार्थ्यांना सर्व बाबतीत परिपूर्ण केले पाहिजे. यावेळी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरचे डॉ. प्रभाकर माने यांनी सत्राध्यक्ष म्हणून काम पाहिले.

     समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉ.एस.एम.भोसले यांनी देशाच्या चिरंतन व सर्वसमावेशक विकासासाठी सक्षम नियोजनाची गरज असल्याबाबत बोलले. यावेळी अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी देशाच्या विकासाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केले.

     याप्रसंगी प्रा.डॉ. अनिल पाटील यांनी अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या. सुयेकचे कार्याध्यक्ष डॉ. बोदगिरे,डॉ. कांबळे,डॉ.बाबर व कु.पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

      कार्यशाळेचे समन्वयक उपप्राचार्य प्रा.जे. ए.यादव यांनी कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकेत कार्यशाळा आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.आभार डॉ. कुलदीप पाटील यांनी मानले व या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. बागल यांनी केले.

        या कार्यक्रमास अर्थशास्त्र अभ्यास मंडळ व व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

       या कार्यक्रमाचे उत्तम व नीटनेटके नियोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम समन्वयक उप प्राचार्य प्रा.जे. ए. यादव, डॉ. कुलदीप पाटील,डॉ.कदम व डॉ.ओलेकर यांनी उत्तम पद्धतीने पार पाडली. 

      कार्यशाळेस उपस्थित असणाऱ्या प्राध्यापकांनी कार्यशाळेच्या नियोजना बाबत समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा