Breaking

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

*जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी संकलित केले प्लॅस्टिक*

 

माझी वसुंधरा अभियानांतर्गत प्लॅस्टिक संकलन


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सोमवार दिनांक २६ ऑगस्ट, २०२४ रोजी 'माझी वसुंधरा अभियान' या उपक्रमांतर्गत कॉलेज परिसरामध्ये मध्ये प्लास्टिक संकलन केले.

      राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी माझी वसुंधरा अभियान या उपक्रमाच्या माध्यमातून कॉलेजच्या २५ एकराच्या परिसरामधील विविध स्वरूपातील प्लास्टिक पिशवी, विविध प्लास्टिक आवरण, प्लास्टिक बॉटल्स व अन्य स्वरूपातील प्लास्टिक गोळा करण्यात आले. सदरचा प्लास्टिक कचरा जयसिंगपूर नगर परिषदे कडे सुपूर्त करण्यात आला.

     सदरच्या उपक्रमास शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले व जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा,मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

      या उपक्रमात कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर ,डॉ. प्रभाकर माने., एनएसएस प्रतिनिधी रोहन लाले, वीर कडाले,ऋतुजा सावंत, प्रथमेश कोळी व अन्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा