![]() |
नशा मुक्त युवक व हर घर तिरंगा उपक्रमात विद्यार्थ्यांना शपथ प्रदान करताना उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे व सन्माननीय प्राध्यापक वृंद |
*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांना 'नशा मुक्त युवक' व 'हर घर तिरंगा' या शासन पुरस्कृत उपक्रमाच्या अनुषंगाने शपथ प्रदान कार्यक्रम सोमवार दिनांक १३ ऑगस्ट, २०२४ रोजी संपन्न झाला.
प्रारंभी कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ. सौ. विजयमाला चौगुले यांनी 'नशा मुक्त युवक' या विषयावर व्यावहारिक उदाहरणाच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन सांगोपांग मांडणी केली. युवकांनी नशेच्या आहारी न जाता राष्ट्र, समाज व कौटुंबिक विकासासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच नशा मुक्त देश हा राष्ट्राच्या अभिमानाचा व सन्मानाची बाजू आहे. त्याचबरोबर हर घर तिरंग्याच्या माध्यमातून आपण तिरंग्याच्या सन्मानार्थ व तिरंग्याशी वचनबद्धता ठेवून राष्ट्राविषयी आपलं कार्य अविरतपणे सुरू ठेवावे असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नशा मुक्त युवक व हर घर तिरंगा यासाठी शपथ प्रदान केली.
सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच संचालक डॉ. तानाजी चौगले व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. संतोषकुमार डफळापुरकर, डॉ. संदीप तापकीर ,प्रा. सुरज चौगुले, प्रा.बाळासाहेब पाटील, प्रा. सुशांत पाटील,डॉ. राजेंद्र कोळी,प्रा.अमोल.पवार,प्रा. कविता चानकने,प्रा.माधुरी कोळी, प्रा. रविंद्र कांबळे, प्रा. बागवान, प्रा. राठोड, प्रा. परीट ,एनएसएस प्रतिनिधी रोहन लाले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा