![]() |
शिरोळच्या रोटरी क्लब पदग्रहण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मलिकार्जुन बड्डे व सर्व पदाधिकारी |
*रोटरी क्लबचा पदग्रहण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
शिरोळ : रोटरी क्लबने शिरोळ परिसरात विविध उपक्रमाद्वारे उत्कृष्ट काम राबवून समाजाभिमुख कार्य केले आहे त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो तसेच यापुढेही अधिक रचनात्मक काम करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन सांगली मिड टाऊन रोटरी क्लबचे मलिकार्जुन बड्डे यांनी केले.
शिरोळ येथील टारे सभागृहात रोटरी क्लब ऑफ शिरोळचा पदग्रहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी नूतन अध्यक्ष सुनील बागडी सेक्रेटरी डॉ.अंगराज माने, खजानिस दिनेश माने-गावडे यांचा पदग्रहण झाला.यावेळी रोटरीचे असिस्टंट गर्व्हनर सागर आडगाणे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत मोहन माने व प्रास्ताविक नितीन शेट्टी यांनी केले.मावळते अध्यक्ष आबा जाधव यांनी रोटरीच्या कार्याची माहिती दिली.यावेळी सबिहा मुसा शेख, मोहन माने व अशोक टारे यांचा विशेष सत्कार झाला.डॉ.अंगराज माने यांनी आभार मानले.सूत्रसंचालन दीपक ढवळे यांनी केले.
या कार्यक्रमास अविनाश टारे, अंजिक्य पाटील, तानाजी संकपाळ,बापूसो गंगधर, श्रीकांत शिरगुप्पे, अतुल टारे, शिवराज महात्मे, अमित पंडित, पंडित काळे, शरद चुडमुंगे, चिंतामणी गोंदकर, प्रवीण कनवाडे, बाळासो शेट्टी, रणजीत जगदाळे,संदीप बावचे,मुरलीधर कुंभार, तोफिक मुल्ला यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा