Breaking

रविवार, १ सप्टेंबर, २०२४

*जयसिंगपुरातील एका महिलेचे सोन्याचे गंठण बाईक स्वार चोरट्याने केले लंपास

 


जयसिंगपुरातील एका महिलेचे चोरट्याने लंपास केले सोन्याचे गंठण 


*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*


जयसिंगपूर : येथील अंगणवाडी मदतनीस श्रीमती दिपाली सुनिल कोरे यांच्या गळ्यातील ७५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने धुमस्टाईलने लंपास केले असल्याची फिर्याद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

   याबाबत अधिक माहिती अशी, शाहूनगर येथील श्रीमती दिपाली कोरे या शुक्रवारी दुपारी ३.१५ वा. च्या सुमारास संभाजीपूर ते शाहूनगर रस्त्यावरून चालत जात असताना त्या महावीर चौकातील शाळा नं. ९ येथे आल्या असता एका लाल रंगाच्या शाईन मोटारसायकलवरून हेल्मेट घातलेला अज्ञात इसमाने कोरे यांच्या गळ्यातील ७५ हजार रूपये किंमतीचे फॅन्सी चेन गंठण हिसडा मारून लंपास केले. याबाबतची फिर्याद श्रीमती कोरे यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली असून स. पो. नि. कदम हे अधिक तपास करीत आहेत.

    या घटनेने शाहूनगर परिसरात खळबळ माजली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा